TRENDING:

सचिन तेंडुलकरच्या नावावर 10 रुपयांचा शेअर 9 हजारांवर पोहोचला, आता कंपनी म्हणाली- आमचा काही संबंध नाही; गुंतवणूकदारांची झोप उडाली

Last Updated:

RRP Semiconductor And Sachin Tendulkar: शेअर बाजारात खळबळ उडवणाऱ्या RRP सेमिकंडक्टरने शेवटी मौन तोडले आहे. कंपनीने स्पष्ट केलं की सचिन तेंडुलकर यांचा त्यांच्या कंपनीशी काहीही संबंध नाही. पण अफवांमुळे कंपनीचा शेअर 57,000% ने उडाला आणि गुंतवणूकदार स्तब्ध झाले आहेत.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: मंगळवारी (14 ऑक्टोबर) RRP सेमिकंडक्टर लिमिटेड या कंपनीने एक महत्त्वाचे निवेदन जारी करत स्पष्ट केले आहे की, क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांचा त्यांच्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा कंपनीच्या शेअरच्या किंमतींमध्ये एप्रिल 2024 पासून तब्बल 57,000% वाढ झाली आहे.

advertisement

सचिनचा कंपनीशी कोणताही संबंध नाही

कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट सांगितले की, सचिन तेंडुलकर आमचे शेअरहोल्डर नाहीत, त्यांनी कंपनीचे कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नाहीत आणि ते आमचे ब्रँड अॅम्बेसेडरही नाहीत. तसेच कंपनीने हेही सांगितले की- काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत की सचिन तेंडुलकर कंपनीचे गुंतवणूकदार आहेत किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी त्यांचा संबंध आहे.

advertisement

अफवा आणि अनैतिक ट्रेडिंगमुळे वाढले शेअरचे भाव

RRP सेमिकंडक्टरने सांगितले की, शेअरच्या किंमतीतील ही प्रचंड वाढ कंपनीच्या वास्तविक कमाईमुळे नव्हे, तर अफवा आणि अनएथिकल (अनैतिक) ट्रेडिंगमुळे झाली आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 2% वाढीसह 8,584 वर बंद झाला. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये 13,050% वाढ आणि एप्रिल 2024 पासून आतापर्यंत तब्बल 57,131% उडी दिसली आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन 11,550 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

advertisement

कंपनीचा स्पष्ट खुलासा

-सचिन तेंडुलकर यांनी कंपनीचे कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नाहीत.

-ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा सल्लागार मंडळाचा भाग नाहीत.

-ते कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडरही नाहीत.

-कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून 100 एकर जमीन मिळाल्याचा दावा खोटा आहे.

advertisement

आर्थिक स्थिती एवढ्या भावासाठी सक्षम नाही

कंपनीची आर्थिक स्थिती इतकी मजबूत नाही की तिचा शेअर 10- 15 वरून 9,000 पर्यंत जावा. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास, कंपनीच्या फंडामेंटल्स इतके सक्षम नाहीत की एवढी झपाट्याने वाढ योग्य ठरावी, असे RRP सेमिकंडक्टरने म्हटले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे फक्त 4,000 शेअर्स डीमॅट फॉर्ममध्ये आहेत. काही लोक अनैतिक आणि चुकीच्या पद्धतीने शेअर्सची ट्रेडिंग करत आहेत. ज्यामुळे कंपनी आणि सचिन तेंडुलकर दोघांची प्रतिमा मलिन होत आहे.

99% शेअर्स लॉक-इन पिरियडमध्ये

RRP सेमिकंडक्टरने आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. कंपनीचे 99% शेअर्स प्रीफरेंशियल अलॉटमेंटअंतर्गत जारी करण्यात आले आहेत आणि ते 31 मार्च 2026 पर्यंत लॉक-इन पिरियडमध्ये आहेत. म्हणजे या शेअर्सची विक्री किंवा खरेदी सध्या करता येत नाही. तसेच कंपनीच्या बोर्ड मेंबर्स किंवा प्रमुख कर्मचाऱ्यांनी (KMP) कोणत्याही प्रकारचे व्यवहार केलेले नाहीत.

निवेशकांना सावधानतेचा सल्ला

कंपनीने सांगितले आहे की, ती अशा लोकांवर कारवाई करणार आहे जे अफवा पसरवून सचिन तेंडुलकर आणि कंपनीची प्रतिष्ठा खराब करत आहेत. गुंतवणूकदारांना त्यांनी सावध राहण्याचा आणि केवळ अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीचा इतिहास आणि नावबदल

या कंपनीचे मूळ नाव GD ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड असे होते. मे 2025 मध्ये कंपनीने आपले नाव बदलून RRP सेमिकंडक्टर लिमिटेड असे ठेवले. ही एक लहान आकाराची (small-cap) कंपनी आहे. जी मुख्यतः शेअर्स आणि सिक्युरिटीजमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करते. कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स, सेमिकंडक्टर चिप्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजी क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना जाहीर केली आहे, पण अद्याप तिचा कोर बिझनेस ट्रेडिंगच आहे.

कंपनीचा कोणताही मोठा सेमिकंडक्टर उत्पादन प्रकल्प किंवा मोठा औद्योगिक गुंतवणूक प्रकल्प अस्तित्वात नाही. ही कंपनी 1980 मध्ये स्थापन झाली होती आणि सध्या BSE वर सूचीबद्ध (listed) आहे.

मराठी बातम्या/मनी/
सचिन तेंडुलकरच्या नावावर 10 रुपयांचा शेअर 9 हजारांवर पोहोचला, आता कंपनी म्हणाली- आमचा काही संबंध नाही; गुंतवणूकदारांची झोप उडाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल