निम्बर्गी गावात राहणाऱ्या ऋतुजा बिराजदार यांचे शिक्षण आयटी डिप्लोमापर्यंत झाले असून वर्क फ्रॉम होम जॉब करत शेवग्याच्या पाल्यापासून मोरिंगा पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. शेतामध्ये असलेल्या शेवग्याच्या झाडांचा पाला घरामध्ये असलेल्या शेळ्यांना खाण्यासाठी दिला जात होता. एकदा युट्युबवर व्हिडिओ पाहत असताना ऋतुजाला शेवग्याच्या पाल्यापासून मोरिंगा पावडर बनवण्याचा व्हिडिओ पाहिला त्यानुसार ऋतुजा यांनी प्रक्रिया करून मोरिंगा पावडर बनवला आणि व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून पावडर विक्री करण्यास सुरुवात केली. चार दिवसानंतरच पहिली ऑर्डर ऋतुजा यांना मिळाली.
advertisement
ऋतुजा यांनी जानेवारी महिन्यापासून मोरिंगा पावडर विक्रीस सुरुवात केली. हा व्यवसाय सुरू करून तीन महिने झाले असून आतापर्यंत जवळपास 40 ते 50 किलो मोरिंगा पावडरची विक्री झाली आहे. ऋतुजा बिराजदार यांनी केलेल्या योग्य मार्केटिंगमुळे सोलापूरबरोबरच पुणे, मुंबई आणि हैदराबादपर्यंत पावडराची विक्री होत आहे. 50 ग्रॅमपासून ते 1 किलोपर्यंतचे पाकीट तयार करून विक्री करत आहे. शेवग्याच्या पानांपासून बनवलेली ही पावडर आरोग्यदायी असून, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, वजन कमी करणे यासाठी लोकप्रिय आहे. ऋतुजा सांगतात.