advertisement

Success Story : नोकरीच्या पगारात भागत नव्हता खर्च, तरुणाने सुरू केला तेल व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल

Last Updated:

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने खाजगी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करत यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

+
News18

News18

सोलापूर : अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने खाजगी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करत यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे. संदीप नंदकिशोर कापसे राहणार माढा असे या तरुणाचे नाव आहे. तो लाकडी घाण्याच्या तेल व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाखांची उलाढाल करत आहे.
माढा तालुक्यातील संदीप कापसे यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे पुणे येथे खाजगी नोकरी केली. मात्र वाढती महागाई आणि नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून कोणतीही बचत होत नसल्याने त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पुणे येथून सोलापुरात परतल्यानंतर संदीप यांनी रहस्य या नावाने व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी लाकडी घाण्याच्या माध्यमातून शेंगदाणा तेल आणि करडई तेल तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. व्यवसाय नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात विक्री करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि योग्य मार्केटिंगच्या जोरावर त्यांनी व्यवसायात हळूहळू प्रगती साधली.
advertisement
आज संदीप कापसे यांनी रहस्य या नावाला एक ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली आहे. लाकडी घाण्यापासून तेल तयार करण्याबरोबरच गूळ पावडर, गूळकळी, गुलकंद, सेंद्रिय हळद तसेच आवळ्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या या व्यवसायातून सध्या महिन्याला सुमारे 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्यवसायाकडे वळावे, असा सल्ला संदीप कापसे यांनी दिला आहे. सुरुवातीला काही अडचणी येतात, मात्र चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश नक्की मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरीच्या पगारात भागत नव्हता खर्च, तरुणाने सुरू केला तेल व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement