Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर डंका! 7 दिवसांत 4 डिजिट कमाई, 'जवान'ला टाकलं मागे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dhurandhar 2 Box Office Collection : आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने रिलीजच्या अवघ्या 7 दिवसांत 4 डिजिट कमाई केली आहे. सिनेमाने शाहरुख खानच्या 'जवान'ला मागे टाकलं का?
रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने 'कांतारा चॅप्टर 2', 'ॲनिमल' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या चित्रपटांना मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 भारतीय चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर वेगाने प्रगती करत आहे. हा चित्रपट आता प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. त्या चित्रपटाने जगभरात आपल्या संपूर्ण प्रदर्शनकाळात 1042.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने जगभरात 1,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'पुष्पा 2: द रूल'च्या यादीत सहभागी झाला आहे. जागतिक स्तरावर 1,000 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात फास्ट प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंग आणि अल्लू अर्जुन या दोघांच्याही चित्रपटांनी अवघ्या 7 दिवसांत हा पराक्रम केला आहे.








