advertisement

पहाटेच्या वेळी पांढरी कार आली; महिलेनं सिगारेट विक्रेत्याची कॉलर पकडली, कारसोबत फरफटत नेलं अन्...मुंबईतील थरार

Last Updated:

फिर्यादी विक्रेता तिथे सिगारेट विक्री करत असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून चार व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी ८७० रुपयांच्या सिगारेट विकत घेतल्या

कार चालकाचं धक्कादायक कांड (प्रतिकात्मक फोटो)
कार चालकाचं धक्कादायक कांड (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यात अवघ्या 870 रुपयांसाठी एका निष्पाप विक्रेत्याचा जीव धोक्यात घालणारा प्रकार मुंबईच्या ओशिवरा भागात घडला आहे. सिगारेट खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्यास नकार देत, कारमधील तरुणांनी विक्रेत्याला चक्क १०० मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेलं. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मुख्य आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून, इतर साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी पहाटे ५ च्या सुमारास न्यू लिंक रोडवरील 'लकी बिर्याणी' हॉटेलजवळ ही घटना घडली. फिर्यादी विक्रेता तिथे सिगारेट विक्री करत असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून चार व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी ८७० रुपयांच्या सिगारेट विकत घेतल्या, मात्र पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विक्रेत्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
advertisement
विक्रेता आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी कारच्या खिडकीजवळ उभा होता. यावेळी कारमध्ये बसलेल्या एका महिलेने विक्रेत्याची कॉलर पकडली, तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्याला कानशिलात लगावली. हे कमी म्हणून की काय, कारचालकाने अचानक गाडीचा वेग वाढवला. यात तो विक्रेता कारसोबत सुमारे १०० मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत गेला. या जीवघेण्या प्रकारात विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
याप्रकरणी २५ मार्च रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. कारमधील इतर तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पहाटेच्या वेळी मुंबईच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
पहाटेच्या वेळी पांढरी कार आली; महिलेनं सिगारेट विक्रेत्याची कॉलर पकडली, कारसोबत फरफटत नेलं अन्...मुंबईतील थरार
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement