advertisement

Astrology: सिंह, मेषसहित या राशीला एप्रिलच्या मध्यात खुशखबर; उच्च राशीतील सूर्यदेव भाग्याचे दार उघडणार

Last Updated:
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह ठराविक काळानंतर रास बदलत राहतात. काही ग्रह लवकर तक काही ग्रह बिलंबाने रास बदलतात. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य हा आत्मा, पिता, सन्मान, आरोग्य, सरकारी नोकरी आणि ऊर्जा यांचा कारक ग्रह मानतात. सूर्याच्या स्थितीतील बदलाचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो.
1/6
सूर्य साधारणपणे दर महिन्याला राशी बदलतो. सध्या तो मीन राशीत असून एप्रिलच्या मध्यामध्ये तो राशी बदलून आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीमध्ये प्रवेश करेल. सूर्याच्या मेष राशीतील प्रवेशाचा सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम होईल. तीन राशींना मात्र या परिवर्तनाचा मोठा लाभ मिळू शकतो. सूर्याच्या मेष राशीतील प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो, पाहुया.

2/6
द्रिक पंचांगानुसार, सूर्य मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 09:38 वाजता मेष राशीत प्रवेश करेल आणि तिथून शुक्रवार, 14 मे 2026 रोजी सकाळी 06:28 वाजेपर्यंत या राशीत राहील. मग तो वृषभ राशीत प्रवेश करेल. तीन राशीच्या लोकांवर याचा चांगला परिणाम दिसेल.

3/6
मेष - सूर्याचे गोचर मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. सूर्य या राशीच्या लग्न स्थानात असेल. पंचम स्थानाचा स्वामी आणि प्रथम स्थानात असल्यामुळे, या राशीला विशेष लाभ मिळू शकतो. कामात आत्मविश्वास खूप असेल, सोबतच नेतृत्व क्षमताही वाढू शकते. तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकता. तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कामाचे कौतुक होईल, पदोन्नतीची शक्यता आहे.

4/6
मेष राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी देखील मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना प्रचंड यश मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि समाजात तुमचा आदर वाढू शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे चांगले स्थळ येऊ शकते.

5/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांना सूर्याचे त्याच्या उच्च राशीतील संक्रमण फायदेशीर ठरू शकते. या राशीचा उच्च राशीस्वामी नवव्या घरात भ्रमण करत आहे. परिणामी या राशीत जन्मलेल्यांना भाग्याची साथ मिळू शकते. समाजात वाढलेल्या आदरासोबतच लोकप्रियताही वाढू शकते. तुमची निर्णयक्षमता चांगली होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. या राशीत जन्मलेल्यांची त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली होऊ शकते, महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. हा काळ व्यावसायिकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही जोखीम पत्करली तर भविष्यात तुम्हाला यश मिळू शकते.

6/6
धनु - सूर्याचे मेष राशीतील संक्रमण या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असू शकते. नवव्या घराचा स्वामी म्हणून सूर्य पाचव्या घरात प्रवेश करत आहे. परिणामी, या राशीच्या व्यक्तींना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. तुमचे उत्पन्न वाढू शकते, सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कामात असलेल्यांना फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्हाला आरोग्याच्या बाबतीतही फायदा होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement