TRENDING:

Success Story : कॉलेज सांभाळत व्यवसायाची वाट, सलोनीचा चीजकेक स्टॉल हिट, महिन्याची कमाई तर पाहाच

Last Updated:

अनेक जण कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असतानाच आपल्या आवडीला व्यवसायाचं रूप देत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे मुंबईतील सायन येथे राहणाऱ्या सलोनी गाडी हिची आहे. 

advertisement
मुंबई: आजची तरुणाई ही केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वळताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक जण कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असतानाच आपल्या आवडीला व्यवसायाचं रूप देत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे मुंबईतील सायन येथे राहणाऱ्या सलोनी गाडी हिची आहे.
advertisement

माटुंगा येथील रुईया कॉलेज असलेल्या रुईया कट्टा इथे सलोनीने छोटासा स्टॉल सुरू केला आहे. दररोज संध्याकाळी ती इथे चीजकेक, विविध प्रकारचे मॉकटेल्स आणि इतर घरगुती पदार्थ विकते. हे सर्व पदार्थ ती स्वतः तयार करते. कॉलेजचं शिक्षण सांभाळत ती हा पार्ट-टाइम व्यवसाय यशस्वीपणे करत आहे.

लहानपणापासून स्वयंपाकाची आवड

सलोनी मूळची कोकणातील आहे. लहानपणापासूनच तिला स्वयंपाकाची आवड होती. घरी आई कोकणी पदार्थ बनवत असताना ती निरीक्षण करत असे. तिसरीत असताना तिने पहिल्यांदा एक पदार्थ बनवला आणि तो उत्तम जमला. तेव्हापासून तिचा आत्मविश्वास वाढत गेला आणि ती वेगवेगळे पदार्थ बनवू लागली.

advertisement

Mumbai Food : ट्रेंडिंग चॉकलेट बाउल, फक्त 70 रुपयांपासून चाखा चवं, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

आईसोबत किचन आणि क्लाऊड किचन

अकरावी-बारावीमध्ये असताना सलोनी आणि तिच्या आईने मिळून छोट्या प्रमाणात किचन चालवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी क्लाऊड किचनही सुरू केले. या अनुभवातूनच सलोनीला व्यवसायाची समज मिळाली आणि स्वतःचा स्टॉल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

advertisement

सुरुवात अवघ्या 5 हजारांपासून

सलोनीने सुरुवातीला सुमारे 5000 रुपयांची गुंतवणूक करून साहित्य खरेदी केले आणि रुईया कॉलेजसमोर स्टॉल सुरू केला. तिच्या पदार्थांना विद्यार्थ्यांकडून आणि स्थानिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला. सलोनीचे वडील मुंबई पोलिस दलात ट्राफिक पोलीस म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीला मुलीने रस्त्यावर स्टॉल लावावा याबाबत त्यांना थोडी शंका होती. मात्र तिची जिद्द, मेहनत आणि ग्राहकांकडून मिळणारे प्रेम पाहून त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला.

advertisement

महिन्याला 35 ते 40 हजारांची कमाई

आज सलोनी कॉलेज शिक्षण (चौदावी) सांभाळत महिन्याला सुमारे 35 ते 40 हजार रुपये कमावत आहे. कमी गुंतवणुकीतून सुरू झालेला हा व्यवसाय तिच्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग ठरला आहे. सलोनी गाडीची ही कहाणी आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणासोबतच स्वतःच्या आवडीचा पाठपुरावा करत मेहनतीने यश मिळवता येते, हे तिने दाखवून दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : कॉलेज सांभाळत व्यवसायाची वाट, सलोनीचा चीजकेक स्टॉल हिट, महिन्याची कमाई तर पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल