तुमचं बँक खातं बंद झालं का?
या चर्चांमुळे अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तर याबाबत आता केंद्र सरकारने महत्त्वाच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जनधन योजनेतून बँक खातं उघडलं नसेल तर घाबरायची काहीच आवश्यकता नाही. जनधन योजनेतील ग्राहकांसाठी ह्या सूचना आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बँक परस्पर न सांगता असे खाती बंद करत नाही. बँक खातं बंद असेल तर त्यावर फाइन मारला जातो, मात्र ते चालू राहातं.
advertisement
बँक नियमांमध्ये मोठा बदल, पेनाल्टी संपली; आता फक्त हवे तेवढेच पैसे ठेवा आणि बाकीचे...
बँकांना दिले महत्त्वाचे निर्देश
डीएफएस, अर्थ मंत्रालयाने, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, बँकांना निष्क्रिय प्रधानमंत्री जन धन योजना खाती बंद करण्याचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. महत्वाचे म्हणजे, डीएफएसने 1 जुलैपासून देशभरात जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेंतर्गत ज्या ग्राहकांची खाती आहेत त्यांना तातडीनं KYC करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
KYC करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत
केंद्र सरकारने याबाबत मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व बँकांना खातेधारकांना पुन्हा KYC करण्याचे आदेश द्यावेत असं सांगितलं आहे. जी खाती 24 महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद आहेत त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधून खातं सुरू ठेवण्यासाठी प्रक्रिया केली जाते. खात्यावर कोणतेही व्यवहार होत नसतील तर त्यावर हॅकर्सचं लक्ष असतं, अशा बँक खात्यांचा आधार घेऊन हॅकर्स टार्गेट करतात, त्यामुळे बँका यावर लक्ष ठेवून असतात.
KYC अपडेट न केल्यास काय होणार?
सुरक्षेच्या कारणास्तवर तुमच्या बँक अकाउंटचं KYC अपडेट ठेवा. जर KYC केलं नसेल तर तुम्हाला सरकारकडून वेळ मिळाला आहे. त्यानुसार न विसरता केवायसी करून घ्या. सध्या सरकारकडून बँक खातं करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत असं मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यामुळे तुमचं खातं बंद होणार असा मेसेज किंवा फोन कोणी केला तर त्यावर विश्वास ठेवू नका. बँक खात्याशी संबंधित माहिती किंवा अपडेट घेण्यासाठी तुमच्या जवळच्या शाखेत किंवा बँक खातं असलेल्या शाखेत भेट द्या आणि तिथून माहिती घ्या असं आवाहन देखील केलं आहे.
