SBI मध्ये मिनिमम बॅलेन्सचे नियम
मार्च 2022 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बेसिक सेव्हिंग्स अकाउंटवर अॅव्हरेज मंथली बॅलेन्सला काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी, एसबीआय खातेधारकांना त्यांच्या अकाउंटमध्ये सरासरी मासिक 3,000 रुपये, 2,000 रुपये किंवा 1,000 रुपये बॅलेन्स ठेवावे लागत होते. त्यांच्या ब्रांचनुसार हा रिशोब राखावा लागत होता.
advertisement
डेबिट किंवा एटीएम कार्डशिवायही काढू शकता पैसे, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस!
ICICI बँकेत मिनिमम बॅलेन्सचे नियम
ICICI बँकेतील रेग्युलर सेव्हिंग्स अकाउंटसाठी अॅव्हरेज मिनिमम बॅलेन्स 10,000 रुपये आणि सेमी अर्बन ब्रांचसाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागातील ब्रांचसाठी मिनिमम सेव्हिंग्स अकाउंट बॅलेन्स क्रायटेरिया 2,000 रुपये आहे.
Cheque वर छापलेले नंबर असतात खास, त्याचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
झिरो बॅलेन्स अकाउंट म्हणजे काय?
अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना झिरो बॅलेन्स बँक अकाउंटची सुविधा देतात. यामध्ये यूझर्सला मिनिमम बॅलेन्स मेंटेन करण्याची गरज नाही. अशा अकाउंट्समध्ये सामान्यतः विनामूल्य व्यवहार आणि पैसे काढण्याची मासिक मर्यादा असते.