Cheque वर छापलेले नंबर असतात खास, त्याचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

Last Updated:

चेकवर हे 23 क्रमांक चार वेगवेगळ्या भागांत लिहिलेले असतात. या 23 पैकी पहिला 6 अंकी क्रमांक तुमचा चेक नंबर सांगतो.

चेक बुक
चेक बुक
नवी दिल्ली : तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्ही चेकबुक वापरत असाल. तुमच्या अकाउंट नंबरव्यतिरिक्त काही नंबर चेकच्या खाली लिहिलेले असतात. या संख्या 4 भागांमध्ये विभागल्या असतात. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हे पाहिले असेल, परंतु या नंबरचे वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? खरं तर, हे नंबर केवळ तुमचा चेक सुरक्षित ठेवत नाहीत तर त्यावरून तुम्ही तुमचे अकाउंट डिटेल्स जाणून घेऊ शकता. एक चेक तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ शकतो. MICR कोडचे पहिले तीन अंक सोडल्यास पुढील तीन अंक त्या बँक अकाउंटची माहिती सांगतात. ते नंबर्स प्रत्येक बँकेचा युनिक कोड असतो.
चेकवर हे 23 क्रमांक चार वेगवेगळ्या भागांत लिहिलेले असतात. या 23 पैकी पहिला 6 अंकी क्रमांक तुमचा चेक नंबर सांगतो. प्रत्येक चेकवर हा क्रमांक वेगळा असतो. उदाहरणार्थ, जर चेकवर 000042 असेल तर पुढील चेकवर 000043 होईल. तुम्ही एखाद्याला चेक दिल्यास किंवा घेतल्यास, हा चेक क्रमांक लिहून घ्यायला हवा. चेक हरवला किंवा खात्यात पैसे जमा न झाल्यास, तुम्ही या नंबरवरून चेकच्या स्टेटसबद्दल माहिती मिळवू शकता.
advertisement
दुसऱ्या भागात 9 अंक लिहिलेले असतात. तो MICR कोड म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नायझेशन कोड आहे. हा नंबर तीन वेगवेगळ्या भागांत विभागला जातो. यामुळे चेक जारी झालेलं शहर, बँक आणि शाखेची माहिती मिळते. एकप्रकारे, हा तुमच्या बँकेच्या शाखेचा पत्ता आहे. MICR कोडचे पहिले तीन अंक सिटी कोड आहेत. त्यात तुमच्या शहराच्या पिन कोडचे फक्त पहिले तीन अंक असतात. हा नंबर पाहून तुमचा चेक कोणत्या शहरातून आला आहे हे कळू शकते. पुढील तीन अंक बँकेचा युनिक कोड असतो. या कोडद्वारे तुम्ही बँकेची माहिती शोधू शकता. शेवटचे तीन अंक शाखा कोड असतात. प्रत्येक बँकेच्या शाखेचा स्वतंत्र शाखा कोड असतो. हा कोड बँकेशी संबंधित प्रत्येक व्यवहारात वापरला जातो.
advertisement
तिसर्‍या भागात छापलेले 6 अंक दर्शवतात की तुमचं अकाउंट आरबीआयद्वारे मेंटेन केलं जातं. जेव्हा चेक आरबीआयकडे प्रोसेसिंगसाठी जातो तेव्हा हा नंबर मदत करतो. शेवटचे 2 अंक हे ट्रॅन्झॅक्शन कोड असतात. ते चेक करंट अकाउंटचा आहे की सेव्हिंग अकाउंटचा, हे दर्शवतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Cheque वर छापलेले नंबर असतात खास, त्याचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement