advertisement

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत BJP-NCP एकत्र सत्तेत बसणार? शीतल शिंदे नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले

Last Updated:

शीतल शिंदे हे महापौरपदासाठी आग्रही होते. परंतु पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराज होऊन ते महापालिकेतून निघून गेले.

राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला
राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : नाट्यमय घडामोडीत उपमहापौरपदी भाजपकडून नाव देण्यात आलेल्या विजय उर्फ शीतल शिंदे यांनी उपमहापौरपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला. राजकारणात काहीही घडू शकते असे म्हणत शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या आदेशानुसार अर्ज भरल्याची माहिती वैशाली काळभोर यांनी दिली. एकंदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र बसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कमालीचा संघर्ष झाला. दिवंगत नेते अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील वाकयुद्ध राज्यात गाजले. अखेर या लढाईत महेश लांडगे यांची सरशी झाली. आता अजित पवार यांच्या माघारी दोन्ही पक्षात संघर्ष नको असे मानून महापालिकेत सत्तेत एकत्र बसण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते.
advertisement

महापौरपदासाठी आग्रही पण संधी न मिळाल्याने शीतल शिंदे नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले

सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाजपचे निष्ठावंत शीतल शिंदे हे महापौरपद मिळावे, यासाठी आग्रही होते. परंतु त्यांचे नाव उपमहापौर पदासाठी पुढे आल्याने ते पक्षावर नाराज झाले. महापौर पदावर रवी लांडगे यांची वर्णी लागल्याने शीतल शिंदे नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले. उपमहापौर पदासाठी शितल शिंदे यांची मनधरणी केली जात होती. परंतु मला उपमहापौरपद नको असे म्हणत त्यांनी पक्षावर आपली नाराजी व्यक्त केली.
advertisement

राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी अर्ज नाही, भाजपचा मार्ग मोकळा

पिंपरी-चिंचवड महापौरपदाची निवडणूक सोमवारी संपन्न झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्ज भरला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे आव्हान दिले होते, मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षाने आदरांजली म्हणून उमेदवार न देण्याचे ठरवले. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढविल्याने भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत BJP-NCP एकत्र सत्तेत बसणार? शीतल शिंदे नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले
Next Article
advertisement
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement