advertisement

तिलक वर्मा T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? सस्पेन्स संपला, वॉर्मअप मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाकडून जोरदार तयारीला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या आधी बीसीसीआयने इंडिया ए टीमची घोषणा केली आहे.

तिलक वर्मा T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? सस्पेन्स संपला, वॉर्मअप मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा!
तिलक वर्मा T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? सस्पेन्स संपला, वॉर्मअप मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाकडून जोरदार तयारीला सुरूवात झाली आहे. वर्ल्ड कपच्या आधी बीसीसीआयने इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. इंडिया ए ची टीम टी-20 वर्ल्ड कपआधी दोन वॉर्मअप मॅच खेळणार आहे. या प्रॅक्टिस मॅचमधून तिलक वर्माचं कमबॅक होणार आहे. दुखापतीनंतर तिलक वर्मा पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

आयुष बदोनी कर्णधार

वॉर्मअप सामन्यांसाठी बीसीसीआयने आयुष बदोनीला टीम इंडियाचं कर्णधारपद दिलं आहे. इंडिया ए चा पहिला वॉर्मअप सामना अमेरिकेविरुद्ध नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दुसरा सामना नामिबियाविरुद्ध बंगळुरूमधल्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होणार आहे. हे दोन्ही सामने तिलक वर्मासाठी त्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहण्याची उत्तम संधी आहे.
advertisement
तिलक वर्माचं कमबॅक हे टीम इंडियासाठी सगळ्यात मोठा दिलासा आहे. शस्त्रक्रियेनंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने तिलकला फिट असल्याचं घोषित केलं, त्यामुळे आता तो 2 फेब्रुवारी म्हणजेच आज अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात इंडिया ए कडून खेळेल. यानंतर तो सीनियर टीममध्ये जाईल.
वॉर्मअप मॅचसाठी इंडिया ए मध्ये 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, यामध्ये नमन धीर, विप्रम निगम आणि फास्ट बॉलर मयंक यादव यांना संधी देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरला इंडिया ए मध्ये संधी मिळालेली नाही, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबद्दलचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement

इंडिया ए टीम

आयुष बदोनी (कर्णधार), नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्या, एन.जगदीशन, तिलक वर्मा, रियान पराग, मानव सुथार, अशोक शर्मा, उर्विल पटेल, गुरजपनीत सिंग, विप्रज निगम, रवी बिष्णोई, खलील अहमद, मयंक यादव
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
तिलक वर्मा T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? सस्पेन्स संपला, वॉर्मअप मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा!
Next Article
advertisement
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement