TRENDING:

सेबीचा इशारा! शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांना येऊ शकते टॅक्स नोटीस, राहा सावधान

Last Updated:

बाजार नियामक सेबीने शेअरमध्ये पैसे लावणाऱ्यांना सावधान केले आहे. कारण त्यांच्या नावावर बनावट लेटरहेडच्या माध्यमातून पैसा वसूल केला जात आहे.

advertisement
नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना सेबीने इशारा दिला आहे की, त्यांच्या नावावर येणाऱ्या नोटीसपासून सावधान राहा. बाजार नियामकाने म्हटले की, फसवणूक करणारे सध्या सेबीच्या लेटरहेडवर बनावट नोटीस जारी करतात आणि गुंतवणुकदारांसह फ्रॉड करत आहेत.बाजार नियामकाने गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) भरण्याची मागणी करणाऱ्या बनावट नोटिसांबद्दल सावधगिरी बाळगली आहे. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही नोटिसची सत्यता पडताळून पाहावी.
शेयर मार्केट
शेयर मार्केट
advertisement

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ने म्हटले की, फ्रॉड करणारे नियामकच्या 'लेटरहेड' तयार करुन बनावट नोटीस पाठवत आहेत आणि थकीत एसटीटी रक्कम भरण्याची विनंती करत आहेत. नियामकाच्या संज्ञानमध्ये आलेय की, काही फ्रॉड करणारे वित्त कायदा, 2004 सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) च्या अनुपालनची मागणी करत नोटीस जारी केली आहे. नियामकाने म्हटले की, गुंतवणूकदारांना सूचित केले जाते की, ही नोटीस सेबीने जारी केली नाही आणि या नोटीसवर कोणतेही पैसे देऊ नये.

advertisement

या ट्रिकने कमी होईल तुमचं क्रेडिट कार्डचं व्याज! बँका हे कधीच सांगणार नाहीत

सेबीच्या इशाऱ्यात काय आहे?

सेबीच्या मते, गुंतवणूकदारांना माहिती दिली जाते की स्टॉक एक्सचेंजवर केलेल्या प्रत्येक खरेदी आणि विक्री व्यवहारावर एसटीटी आकारला जातो आणि कर ब्रोकरद्वारे वसूल केला जातो. सेबीने स्पष्ट केले की ते एसटीटी रक्कम जमा करण्यासाठी नोटीस जारी करत नाही किंवा या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) शी समन्वय साधत नाही.

advertisement

कशी होते फसवणूक 

सेबी अधिकाऱ्यांची नक्कल करून किंवा गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी बाजार नियामकाचा लोगो, सील किंवा लेटरहेडचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांविरुद्धही नियामकाने इशारा दिला.सेबीने म्हटले की, असे व्यक्ती सेबीच्या नावावर पत्र, ईमेल किंवा नोटीस पाठवून मोठ्या-मोठ्या गुंतवणूकदारांसोबत फ्रॉड करत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान होत आहेत. म्हणून, लोकांना विनंती आहे की त्यांनी सावधगिरी बाळगावी आणि माहिती किंवा पेमेंट मागणाऱ्या सेबीच्या पत्रांची/सूचनांची सत्यता तपासावी.

advertisement

10 लाखांची एक FD की एक-एक लाखांच्या 10, कोणता पर्याय सर्वात बेस्ट?

वचन देणाऱ्यांपासून सावध राहा

सेबीने गुंतवणूकदारांना अकाउंट हाताळणाऱ्या किंवा निधी व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या आणि शेअर बाजारात जोखीममुक्त रिटर्न देण्याचे आश्वासन देणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध केले आहे. नियामकांनी म्हटले की, या संस्था पोर्टफोलियो किंवा अकाउंट प्रबंधन सेवा प्रदान करण्याचा दावा करतात आणि नेहमीच गुंतवणूकदारांना ट्रेडिंग अकाउंटची माहिती मागतात. सोबतच ते नफ्यातील वाटा देखील गोळा करतात. खरंतर नियामकाने म्हटले की, नुकसान पूर्णपणे गुंतवणूकदारांनाच उचलावा लागतो. म्हणून, अशी आश्वासने आणि दावे करणाऱ्यांपासून सावध रहा.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
सेबीचा इशारा! शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांना येऊ शकते टॅक्स नोटीस, राहा सावधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल