अमेरिका आणि चीन यांच्यातील आयात शुल्काबाबतचे निर्णय आणि भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामामुळे बाजाराच्या भावनांमध्ये सुधारणा झाली. सर्व क्षेत्र हिरव्या रंगात बंद झाले. सोमवारी एका शेअरमध्ये घसरण झाली तर त्या तुलनेत १० शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
फेब्रुवारी २०२१ नंतर प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी एकाच दिवसात ४% वाढीसह बंद झाले आहेत. आजच्या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात १६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. यासोबतच बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. या तेजीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स आता ७ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत जे आता २०२५ मधील देखील सर्वोच्च स्तर बनले आहे.
advertisement
आयात शुल्काच्या निर्णयानंतर आयटी आणि मेटल स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी आयटीमध्ये ७% पेक्षा जास्त वाढ झाली. जी या इंडेक्ससाठी गेल्या ५ वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे. निफ्टीच्या ५० पैकी ४८ स्टॉक्स हिरव्या रंगात बंद झाले. यामध्ये १ ते ८% पर्यंत वाढ दिसून आली.
बाजार कोणत्या स्तरावर बंद झाला?
सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स २,९७५ अंकांच्या तेजीसह ८२,४३० च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ९१७ अंकांच्या वाढीसह २४,९२५ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक १,७८८ अंकांच्या तेजीसह ५५,३८३ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी मिड-कॅप इंडेक्स २,१९३ अंकांच्या तेजीनंतर ५५,४१६ च्या पातळीवर बंद झाला.
आज कोणत्या स्टॉक्समध्ये दिसली ॲक्शन?
हॉटेल आणि टूरिझम शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. इंडियन हॉटेल्स आणि इंडियागोमध्ये ७-७% ची वाढ झाली. निफ्टीच्या सर्वाधिक वाढलेल्या शेअर्सच्या यादीत इन्फोसिस, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ट्रेंट आणि विप्रो यांचा समावेश होता. निफ्टीमधून केवळ इंडसइंड बँक आणि सन फार्मा लाल रंगात बंद झाले.
मिड-कॅपमधून आज बिर्लासॉफ्ट, हिंड कॉपर, एस्कॉर्ट्स, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस, एसजेव्हीएन, सेल आणि एनबीसीसी यांचे शेअर्स सर्वाधिक वाढलेल्या शेअर्समध्ये सामील होते. सोलर इंडस्ट्रीज आणि एचएएल सारख्या डिफेन्स स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.
