कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी 22 तारखेला 930 अंकांची घसरण नोंदवली होती तर आज बुधवारी सेन्सेक्समध्ये 138.74 ने घसरण पाहायला मिळाली. तर 22 तारखेला मंगळवारी निफ्टीही 24,500 च्या खाली तर आज बुधवारी 23 तारखेला 24435 च्या खाली घसरला. यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती एका झटक्यात 8.86 लाख कोटी रुपयांनी कमी झाली. तसेच आजची पडझड चौफेर होती. एकंदरीतच या शेअर बाजारातील घसरण कशामुळे झाली, हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
कमकुवत निकाल -
शेअर बाजाराच्या हालचालींवर सर्वाधिक परिणाम करणारे कारण म्हणजे कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल हे आहे. आत्तापर्यंत ज्या कंपन्यांनी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत त्यापैकी बहुतांश कंपन्यांनी बाजाराची निराशा केली आहे. यामुळे शेअर्सची मोठी घसरण दिसून आली आहे, ज्यामुळे विक्री आणखी तीव्र झाली आहे. दुसरीकडे, सिटी युनियन बँकेसह ज्या कंपन्यांचे निकाल चांगले आहेत, त्यांची वाढ चांगली झाली आहे
एफआयआयद्वारे विक्री -
विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून सातत्याने पैसे काढून घेत आहेत. या महिन्यात आतापर्यंत त्यांनी 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली आहे. शेअर बाजाराच्या इतिहासातील एका महिन्यात त्यांनी केलेली ही सर्वात मोठी विक्री आहे. या महिन्यात अजून एक आठवडा शिल्लक असून सध्या विक्री थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
बाजारातील मूल्यांकनाबाबत संभ्रमावस्था -
बऱ्याच काळापासून बाजारात मूल्यांकनाबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, जोपर्यंत बाजार चालू होता, तोपर्यंत फंड व्यवस्थापक 100-100 च्या पीईने शेअर्स खरेदी करत होते. मात्र, आता त्याने पैसे रोखून धरण्यास सुरुवात केली आहे. लार्जकॅप शेअर्सपेक्षा मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स अधिक महाग असल्याचे सांगितले जाते.
9 नंबरची भानगड काय? भाजप, मनसे आणि शिवसेनेनंही का वापरला हा फॉर्म्युला?
किरकोळ आणि एचएनआय गुंतवणूकदार चिंतेत -
किरकोळ आणि एचएनआय गुंतवणूकदारांनी अखेर बाजारातील घसरणीबाबत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा बाजारात घसरण व्हायची तेव्हा काही दिवसातच ती उसळी घेत असे. लोकसभा निवडणुकीतही तेच पाहायला मिळाले. तथापि, सप्टेंबरच्या अखेरीस ही घसरण सुरू झाली आणि आज, 23 ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे. एवढी मोठी घसरण अलीकडच्या काळात बाजारात दिसली नव्हती. यामुळे रिटेल आणि एचएनआय गुंतवणूकदारांची भावना थोडीशी कमकुवत होत असल्याचे दिसत आहे.