कंपनी काय करते? मिळालीय मोठी ऑर्डर
ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स ही कंपनी एआयओटी आधारित हेल्थकेअर आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स बनवते. अलीकडेच या कंपनीला डिस्कव्हरी ओक्स पब्लिक स्कूलकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. हा प्रोजेक्ट एज्युजेनी आणि इमोटिफ्स यांसारखी एआय-बेस्ड प्रॉडक्ट्स लागू करण्याशी संबंधित आहे. या प्रोजेक्टचं एकंदर मूल्य तब्बल 1.05 कोटी रुपये आहे.
advertisement
सहा महिन्यांत घसरण; पण वर्षभरात मल्टिबॅग रिटर्न
गेल्या एका महिन्यात ब्लू क्लाउड सॉफ्टेक सॉल्युशन्स या कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्के घसरण झाली आहे. सहा महिन्यांचा विचार केला, तर हा शेअर 63 टक्क्यांपर्यंत घसरला आहे; मात्र गेल्या वर्षभराचा विचार केला, तर या शेअरने 38 टक्के रिटर्न दिला आहे. तसंच, दोन वर्षांत 615 टक्क्यांचा मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. सध्याच्या काळात ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्सचे शेअर स्टॉक स्प्लिट आणि नवा प्रोजेक्ट यांमुळे गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत.
स्टॉक स्प्लिट होण्यापूर्वी तेजी
ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स ही कंपनी पुढच्या आठवड्यात स्टॉक स्प्लिट करणार आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी कंपनीच्या बोर्डाच्या झालेल्या बैठकीत सदस्यांनी 2:1 प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यास मंजुरी दिली होती. याचाच अर्थ असा, की 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरचं एक रुपया फेस व्हॅल्यू असलेल्या दोन शेअर्समध्ये विभाजन केलं जाईल. कंपनीने 20 जानेवारी 2025 ही स्टॉक स्प्लिट करण्यासाठीची रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. ज्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळणार आहे, त्यांची पात्रता ठरवण्यासाठी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.