जागतिक राजकारणातील तणाव आणि युद्धा संघर्षामुळे आज भारतीय शेअर बाजाराने उघडताच गटांगळ्या खाल्ल्या. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पाय काढायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, बाजार उघडताच अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
आज सकाळी बाजार उघडला आणि विक्रीचा असा सपाटा लागला की सेंसेक्स थेट १२०० अंकांनी कोसळला. निफ्टीनेही २२,४७५ ची पातळी तोडली. सकाळी ९:२५ च्या सुमारास ९९७.९९ अंकांच्या घसरणीसह ७२,५८५ वर व्यवहार करत होता. इराण-अमेरिका युद्धामुळे प्रचंड महागाई वाढली आहे. आज क्रूड ऑइलचे दरही वाढले.
advertisement
व्यवहार आणि जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. युद्धा मुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून भारतासारख्या आयातदार देशासाठी हे धोक्याचं लक्षण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा फटका बसला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मोठी विक्री केली. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने Expiry साठी मोठा दबाव दिसून आला.
आजच्या पडझडीत ऑटो, फार्मा, पीएसयू बँक आणि FMCG सेक्टरमध्ये हाहाकार माजला आहे. केवळ ऑईल अँड गॅस आणि मेटल सेक्टरमध्ये थोडी हिरवळ दिसत असली, तरी इतर सर्व सेक्टर 'लाल' निशाण्याखाली दबले गेले आहेत. युद्धादरम्यान बऱ्यापैकी लोकांनी शेअर मार्केटमधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.
