मागील 2 महिन्यांत 21% ची घसरण झाल्यामुळे IT शेअर्स Bear Market Zone मध्ये पोहोचले आहेत. यामुळे प्रमुख IT कंपन्यांचे Market Cap तब्बल ₹8.4 लाख कोटींनी कमी झाले आहे. Nifty IT Index मध्ये 10 प्रमुख IT कंपन्या आहेत, यातील 9 कंपन्या Bear Market Zone मध्ये पोहोचल्या आहेत. LTI Mindtree: 34% घसरण, सर्वाधिक नुकसान झालं. तर TCS आणि Infosys: 24% घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. Wipro: फक्त 17% घसरण, पण तरीही मोठा करेक्शन झालं. L&T Technology Services आणि Coforge: अनुक्रमे ₹15,000 कोटी आणि ₹16,000 कोटींनी Market Value कमी झाली आहे.
advertisement
IT Stocks Crash मागील 6 कारणे
1. अमेरिकेत मंदीची भीती (US Recession Fear)
JP Morgan च्या अंदाजानुसार, 2025 मध्ये US मंदीची 40% शक्यता आहे. मंदीमुळे IT खर्चात कपात होण्याची शक्यता आहे.
2. कमकुवत कमाई वाढ (Weak Earnings Growth)
Morgan Stanley ने भारतीय IT कंपन्यांची FY26 Earnings Growth फक्त 4.5% आणि FY27 साठी 6% एवढी राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
3. Generative AI चा प्रभाव
AI Technology च्या वाढत्या वापरामुळे कंपन्या IT Budget कमी करत आहेत, ज्याचा थेट परिणाम भारतीय IT कंपन्यांच्या Revenue Growth वर होत आहे.
4. Valuation मध्ये समस्या
IT शेअर्सचे P/E Ratio अद्याप 5-Year Average पेक्षा जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अजूनही Valuation घटण्याची शक्यता पाहत आहेत.
5. ग्लोबल IT कंपन्यांची कमकुवत Growth Guidance
International IT कंपन्यांनी FY26 मध्ये मोठ्या वाढीची शक्यता फेटाळली आहे, त्यामुळे भारतीय कंपन्यांवरही दबाव वाढला आहे.
6. US मध्ये Interest Rate Cuts उशिरा होणार
US Inflation High राहिल्यास Federal Reserve व्याजदर लवकर कमी करणार नाही, त्यामुळे भारतीय IT शेअर्सवर प्रेशर राहू शकतो.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
IT शेअर्स सध्या दबावाखाली असले तरी, Long-Term Investment साठी काही स्टॉक्स चांगले ठरू शकतात. Expert Advice घेऊन, Short-Term मध्ये सावधगिरी बाळगावी आणि Long-Term Opportunities शोधाव्यात. आता विकायची घाई केली तर नुकसान होण्याची संभावना आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये होल्ड करावं. तर नवीन गुंतवणूक करणाऱ्यांना मागच्या वर्षभरात कंपनीने काय कामगिरी केली याचा अभ्यास करुनच गुंतवणूक करावी.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)