पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं हे जोखमीचं असतं; मात्र काही स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. त्यांमध्ये फ्रँकलीन इंडस्ट्रीजच्या शेअरचा समावेश होतो. याचा प्रॉफिट टू अर्निंग रेशो 1.50 असून, तो चांगला आहे. पीई रेशो म्हणजे कोणत्याही स्टॉकमध्ये एक रुपया कमावण्यासाठी गुंतवणूकदार किती रुपये देत आहेत. कमी पीई रेशो असलेले स्टॉक्स स्वस्त असतात. फ्रँकलिन इंडस्ट्रीज या कंपनीचं मार्केट कॅपिटल 81.84 कोटी रुपये आहे.
advertisement
गेल्या एका महिन्याच्या कालावधीत फ्रँकलिन इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 35 टक्के वाढ झाली आहे. तसंच, 6 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 9 टक्के तेजी आली आहे. एका वर्षाचा विचार केल्यास या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 120 टक्क्यांचा मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. या शेअरच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर असं लक्षात येतं, की गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे. या स्टॉकमध्ये आता पुन्हा एकदा व्यवहार वाढले आहेत. येत्या काळात त्यात तेजी पाहायला मिळू शकते.
आज, दोन जानेवारीला फ्रँकलिन इंडस्ट्रीजचे शेअर सुमारे पाच टक्क्यांच्या तेजीसह 2.83 रुपयांच्या पातळीवर ब्लॉक झाले. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 45 टक्क्यांहून अधिक खाली घसरून व्यवहार करत आहे. या पेनी स्टॉकने 4.13 रुपयांच्या पातळीवर आपल्या 52 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला होता. त्याची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1.28 रुपये आहे. तरीही या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना एक वर्ष मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे.