योगी लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल माहिती घेऊ या. प्रमोटर्सकडे कंपनीची 59.02 टक्के भागीदारी आहे. पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 40.98 टक्के भागीदारी आहे. प्रमोटर पटेल घनश्यामभाई एन. यांच्याकडे 26.73 टक्के भागीदारी आहे. म्हणजेच त्यांच्याकडे 80,20,000 शेअर्स आहेत. पटेल परेशभाई नानजीभाई या अन्य प्रमोटरकडे तेवढीच भागीदारी आहे.
2025 मध्ये आतापर्यंत योगी लिमिटेडच्या शेअरने सेन्सेक्सच्या तुलनेत 30 टक्क्यांचा उत्तम रिटर्न दिला आहे. त्याशिवाय 27 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये कंपनीने 1,50,00,000 रुपयांच्या कन्व्हर्टिबल वॉरंटच्या अलॉटमेंटला मंजुरी दिली होती. ती 32 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर झाली होती.
advertisement
योगी लिमिटेड या कंपनीची स्थापना 1994 साली पारशर्ती इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या नावाने करण्यात आली होती. ती कंपनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड आहे. ही कंपनी कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस देण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते. ही कंपनी मुंबईतल्या प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक मानली जाते.
फेब्रुवारी 2024मध्ये योगी लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा भाव 34.39 रुपयांपर्यंत घसरला होता. तो त्याचा 52 आठवड्यांतला नीचांक होता. आज, शुक्रवारी योगी लिमिटेड या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअरला ट्रेडिंगमध्ये 10 टक्क्यांचा अपर सर्किट लागलं. शेअरचा दर 7 जानेवारी रोजी 60 रुपये होता. आज हा दर 90.32 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हा दर योगी लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांतला उच्चांक आहे. त्यामुळे आता योगी लिमिटेड कंपनीच्या शेअरने चांगली रिकव्हरी केली आहे. आता तो एका मजबूत अपट्रेंडमध्ये आहे. भारतीय शेअर बाजारात विक्रीचा माहौल असताना ही तेजी आली आहे. याआधी गुरुवारी बाजारात सुस्ती होती आणि सेन्सेक्स 530 अंक घसरून 77,700 अंकांच्या खाली बंद झाला होता.