मिष्टान्न फूड्स या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के लोअर सर्किटसह बंद झाले. तसंच, सोमवारी ते 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह बंद झाले होते. त्याआधी शुक्रवारीही त्यात 10 टक्के घसरण नोंदवली गेली होती. अशा परिस्थितीत गेल्या पाच दिवसांमध्ये या शेअरने 60 टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली होती. आज मात्र त्या शेअर्सनी जबरदस्त पुनरागमन केलं.
advertisement
आज, बुधवारी मिष्टान्न फूड्स कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 8.06 रुपयांच्या पातळीवर खुले झाले. त्यांनी आपल्या सर्वकालीन नीचांकी पातळीला स्पर्श केला; मात्र काही वेळानंतर परिस्थिती एकदम बदलली. आज सकाळी 9.50 वाजल्यानंतर या पेनी स्टॉकमध्ये बायर्स पुन्हा सक्रिय झाले आणि 9 टक्क्यांच्या तेजीसह 9.78 रुपयांच्या पातळीवर त्याने आपली इंट्राडे हाय पातळी तयार केली. ती उत्तम रिकव्हरी दर्शवते. मिष्टान्न फूड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतली उच्चांकी पातळी 25.36 रुपये आहे. त्याची या कालावधीतली नीचांकी पातळी 8.06 रुपये आहे. त्या पातळीला आजच स्पर्श झाला होता.
सेबी या बाजार नियामक यंत्रणेने गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी, तिचे प्रमोटर आणि सीएमडी हितेशकुमार गौरीशंकर पटेल यांच्यासह पाच एंटिटीजना कथित आर्थिक गैरव्यवस्थापन, फसवणूक करणारे व्यवहार आणि कॉर्पोरेट प्रशासनातल्या उणिवा यांसाठी पुढच्या आदेशापर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घातली होती. त्यानंतर या शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळत होती. त्यामुळे एवढी मोठी घसरण झाली होती.
मिष्टान्न फूड्स या स्मॉलकॅप कंपनीचा पी/ई रेशो 2.75 आहे. तसंच, तिचं मार्केट कॅपिटलायझेशन 1.03 हजार कोटी रुपये असून, डिव्हिडंड यील्ड 0.011 टक्के आहे.