TRENDING:

Share Market: शेअर की पैसे छापायचं मशीन! 9 रुपयाच्या शेअरने 6 महिन्यात दिले 400 टक्के रिटर्न

Last Updated:

सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू असली तरी काही स्टॉक्स असे आहेत जे बाजाराच्या उलट दिशेने रॉकेटप्रमाणे सुस्साट कमाई करून देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: रातोरात लॉटरी लागावी अशी अवस्था सध्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचा शेअर घेतला त्यांना 6 महिन्यातच 400 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. 1 लाख रुपये ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवले त्यांना ५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. अक्षरश: लॉटरी लागली आहे. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू असली तरी काही स्टॉक्स असे आहेत जे बाजाराच्या उलट दिशेने रॉकेटप्रमाणे सुस्साट कमाई करून देत आहेत.
News18
News18
advertisement

ब्लू कोस्ट होटल्स लिमिटेड (Blue Coast Hotels Ltd) हा असाच एक मल्टीबैगर शेअर आहे, ज्याने गेल्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. सप्टेंबर 2024 मध्ये या शेअरची किंमत अवघी 9.14 रुपये होती, पण आता तो 47.53 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. यामुळे केवळ 6 महिन्यात 420% चा जबरदस्त परतावा मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिने आधी ब्लू कोस्ट होटल्सच्या शेअर्समध्ये फक्त1,00,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत तब्बल 5,20,000 रुपये झाली असती.

advertisement

Reels आणि फेसबुक पोस्टवरुन तुमचं खरं उत्पन्न शोधणार, हातात येईल नोटीस

सोन्याचं अंड देणारी कोंबडी

गेल्या 6 महिन्यात सेंसेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 10% आणि 11% घसरण केली, मात्र ब्लू कोस्ट होटल्सने बाजाराच्या उलट दिशेने रॉकेटप्रमाणे सुस्साट नफा मिळवून देताना दिसत आहे. हा शेअर केवळ शॉर्ट टर्मच नाही, तर लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठीही सोन्याचे अंडं देणारी कोंबडी ठरू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. या शेअरने 5 वर्षात तब्बल 900 टक्के रिटर्न गुंतवणूकदारांना दिला आहे.

advertisement

ब्लू कोस्ट होटल्स काय करते?

ही कंपनी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायात कार्यरत आहे. गोव्यातील प्रसिद्ध पार्क हयात गोवा रिसॉर्ट & स्पा ही कंपनीची प्रमुख मालमत्ता आहे. कंपनीची सहाय्यक कंपन्या म्हणजे ब्लू कोस्ट हॉस्पिटॅलिटी लिमिटेड, गोल्डन जॉय होटल प्रायव्हेट लिमिटेड आणि सिल्वर रिजॉर्ट होटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत.एवढ्या झपाट्याने वाढलेले स्टॉक्स अचानक कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे या शेअरमध्ये नवीन गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. ब्लू कोस्ट होटल्सने बाजाराच्या मंदीमध्येही गुंतवणूकदारांना किंग बनवले आहे. मात्र, मल्टीबैगर शेअर्समध्ये गुंतवणूक करताना धोका ओळखूनच पाऊले उचलावीत.

advertisement

(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: शेअर की पैसे छापायचं मशीन! 9 रुपयाच्या शेअरने 6 महिन्यात दिले 400 टक्के रिटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल