ग्रीन पोर्टफोलिओचे सह-संस्थापक दिवम शर्मा यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, “पुढील तीन आठवड्यांत बाजाराची घसरण सुरू राहू शकते. त्यामुळे बाजारात 5-7% ची घसरण होऊ शकते.” मंगळवारी सेन्सेक्स 169.62 अंकांच्या वाढीसह 76,499.63 वर बंद झाला. या दृष्टीकोनातून पाहिले तर अर्थसंकल्पापर्यंत सेन्सेक्स 5,355 अंकांनी घसरण्याची शक्यता आहे.
4 सेक्टर करतील मालामाल 2 सेक्टरला उतरती कळा 15 वर्षांपासून अनुभव असलेल्या तज्ज्ञांनी बजेटआधी मोठा दावा केला. यामध्ये चार सेक्टरवर पैसा लावणाऱ्यांना मोठा फायदा होईल. तर 2 सेक्टरमध्ये ज्यांचे पैसे अडकले त्यांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. 40 टक्क्यांपर्यंत दोन सेक्टर्सचे शेअर्स कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रेल्वे, डिफेन्स सेक्टरचे स्टॉक्स कोसळण्याची शक्यता आहे.
advertisement
टेलिकॉम आणि फार्मा सेक्टरवर जोर भारतात 6G ची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच 5G साठी देखील ग्राहक उत्सुक असल्याने रिचार्जच्या किंमती वाढल्या तरीही ग्राहक तेवढे पैसे देऊन 5G प्लॅन खरेदी करत आहेत. शिवाय OTT मुळे टेलिकॉमचा मोठा फायदा झाला आहे. 2030 पर्यंत संपूर्ण देशात 6G येईल. फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये 2.20 लाख कोटींचा फायदा झाला. या वर्षात देखील मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
ऑटो सेक्टरकडून अपेक्षा सणवार असल्यामुळे आणि नव्या वर्षातली स्थिती पाहता, गाड्यांची विक्री आणि त्याचे काही पार्ट्स जास्त प्रमाणात विकले जातील. त्याचा फायदा ऑटो सेक्टरला होणार आहे. गेल्यावर्षी गाड्यांच्या खरेदीत 2023 च्या तुलनेत विक्रमी वाढ झाली. टेलिकॉम, फार्मास्युटिकल, ऑटो सेक्टर यावर्षी छप्परफाड कमाई करून देतील असा विश्वास तज्ज्ञांना आहे.