शेअर बाजार उघडल्यानंतर सुरुवात हिरव्या रंगात झाली. सेन्सेक्स 376.65 अंकांच्या किंवा 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 78,338.73 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 151.80 अंकांच्या किंवा 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 23,767.85 वर व्यवहार करत होता. दरम्यान, आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार करताना दिसून आलं. GIFT NIFTY 105.00 अंकांची वाढ दाखवत आहे.
निक्केई सुमारे 2.37 टक्क्यांच्या वाढीसह 40,237.69 च्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, स्ट्रेट टाइम्स 0.22 टक्के वाढ दर्शवत आहे. तैवानचा बाजार 1.10 टक्क्यांनी वाढून 23,812.02 वर व्यापार करत आहे. तर हँग सेंग 1.91 टक्क्यांनी घसरून 19,310.86 च्या पातळीवर दिसत आहे. त्याच वेळी, कोस्पी 0.50 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. त्याच वेळी, शांघाय कंपोझिट 3,196.78 च्या पातळीवर 0.32 टक्क्यांनी घसरत आहे.
advertisement
मंगळवारच्या सुरुवातीच्या टप्प्यात, अमेरिकेचा 10-वर्षांचा ट्रेझरी 13 बेस पॉईंटने 4.62 टक्क्यांनी घसरला आणि 2-वर्षांचा ट्रेझरी 5 बेस पॉइंटने घसरून 4.27 टक्क्यांपर्यंत 2023 नंतर नवीन उच्चांक गाठला आहे. ब्रोकरेजने सांगितले की सिमेंट क्षेत्रातील त्यांचे आवडते स्टॉक्स ltraTech, श्री सिमेंट, अंबुजा आणि रामको आहेत. नुवोको आणि ACC वर "न्यूट्रल" असे रेटिंग दिले आहे.
मेटल, ऑइल आणि गॅसचे शेअर्स सुस्साट वाढत असल्याचे दिसत आहेत. तर सिमेंटचे स्टॉक्स न्यूट्रल आहेत. निफ्टी IT मध्ये घसरण झाली आहे. निफ्टी बँके हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. CNBC ने दिलेल्या वृत्तानुसार, हिदुस्तान युनिलिव्हर, क्रूड ऑइल हे स्टॉक घेताना थोडी काळजी घ्यावी, FMCG स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक करू शकता. सुशील केडिया यांनी सुचवलेल्या स्टॉक्समध्ये रिलायन्स, डाबर, HUL, टाटा कन्जुमर, टाटा मोटर्स, जिओ फायनान्सचे शेअर्स तुम्ही घेऊ शकता. एफएमसीजी तुम्हाला 3 ते 5 महिन्यात चांगले रिटर्न्स मिळतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.