जर तुम्ही ओला, स्विगी, एनटीपीसी ग्रीनमध्ये गुंतवणूक केली असेल तर लक्ष द्या! फेब्रुवारीमध्ये ह्या शेअर्सची विक्री होऊ शकते, शेअर्सचे काय होईल? भारतीय शेअर बाजार सध्या घसरणीच्या काळातून जात आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे 70,500 कोटी रुपये शेअर बाजारात येण्याची अपेक्षा आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर इतक्या मोठ्या संख्येने शेअर्स विकले जाऊ शकतात
advertisement
यामागचं कारण म्हणजे अलीकडच्या काळात लिस्टेड झालेल्या अनेक कंपन्यांचा लॉक-इन पीरिएड या महिन्यात संपणार आहे. लॉक-इन पीरिएड म्हणजे असा काळ जेव्हा कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यानंतर लगेच विकू शकत नाहीत. त्यांना ठरविक कालावधीपर्यंत गुंतवणूकदारांना ते ठेवावे लागतात किंवा मोठे गुंतवणूकदार बाजारात त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत.
हा कालावधी संपल्यानंतर, त्यांना शेअर्स विकण्याचा पर्याय मिळतो. या शेअर्समध्ये स्विगी, ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सची नावे आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स फेब्रुवारी अखेरपर्यंत आपटण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नुवामा कंपनीने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार 30 एप्रिलपर्यंत 80 कंपन्यांचा लॉक इन पीरिएड संपणार आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स आपटू शकतात. फर्स्टक्राई, SBFC फाइनान्स, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, सॅजिलिटी इंडिया, जूनिपर होटल्स, सेइगल इंडिया, प्रीमियर एनर्जीज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
लॉक इन पीरिएड संपला म्हणून शेअर्स विकली पाहिजेत असं काही नाही. तुम्ही होल्ड देखील करू शकता. मात्र ही रिस्क उचलायची की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)