TRENDING:

Saving Account: एका बँकेत दोन सेविंग अकाउंट उघडता येतात का?

Last Updated:

मुंबईत एका बँकेत दोन सेविंग अकाउंट काढता येत नाहीत, परंतु सॅलरी अकाउंट, संयुक्त खाते, मायनर अकाउंट, ज्येष्ठ नागरिक खाते किंवा झिरो बॅलन्स अकाउंट उघडता येतात.

advertisement
मुंबई: तुम्ही सेविंग अकाउंट किती काढू शकता, एक दोन तीन कितीही पण वेगवेगळ्या बँकेत, पण तुम्ही एकाच बँकेत दोन सेविंग अकाउंट काढू शकता का? तर याचं उत्तर आहे हो आणि नाहीसुद्धा. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर तुम्ही एका बँकेत सॅलरी आणि सेविंग असे दोन्ही अकाउंट काढू शकता पण एकाच बँकेत दोन सेविंग अकाउंट काढता येत नाहीत. मात्र तुम्ही एक छोटी ट्रिक वापरून एकाच बँकेत दोन सेविंग अकाउंट उघडू शकता.
सेव्हिंग अकाउंट
सेव्हिंग अकाउंट
advertisement

बँका 'एक व्यक्ती, एक खाते' या धोरणाचे पालन करतात. याचे मुख्य कारण म्हणजे केवायसी (Know Your Customer) आणि मनी लॉन्ड्रिंग नियमांचे पालन करणे. दोन खाती असल्यास, ओळख आणि व्यवहारांचा मागोवा घेणे बँकेसाठी अधिक कटकटीची होऊ शकते. मग यासाठी तुम्ही वेगवेगळ्या नावाने खातं उघडू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे दुसरे बचत खाते उघडू शकता. मात्र, हे खाते पूर्णपणे त्या व्यक्तीच्या मालकीचे असेल अशी काहीतरी युक्ती वापरू शकता.

advertisement

संयुक्त खाते (Joint Account):

तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत (उदा. कुटुंबातील सदस्य) मिळून संयुक्त बचत खाते उघडू शकता. या खात्यात दोघांनाही व्यवहार करण्याचा अधिकार असतो. तुमचं सेविंग अकाउंट एखाद्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही त्याच बँकेत दोन जॉईंट अकाउंट उघडू शकता. उदा. तुम्ही आईसोबत जॉईंट खातं उघडू शकतो. बायको किंवा वडिलांसोबतही जॉईंट खातं उघडता येतं. तिथेही तुमचं सेविंग खातं असतं.

advertisement

सॅलरी अकाउंट (Salary Account):

हे खाते कंपनी कर्मचाऱ्यांसाठी असते आणि त्याचे नियम सामान्य बचत खात्यापेक्षा वेगळे असू शकतात. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या कंपनीचा बँकेसोबत करार असेल, तर तुम्ही हे खाते उघडू शकता.

मायनर अकाउंट (Minor Account): हे १८ वर्षांखालील मुलांसाठी त्यांच्या पालकांच्या देखरेखेखाली उघडले जाते.

ज्येष्ठ नागरिक खाते (Senior Citizen Account): हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधांसह उघडले जाते.

advertisement

झिरो बॅलन्स अकाउंट (Zero Balance Account): या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. तुमच्या गरजेनुसार बँक तुम्हाला वेगळ्या प्रकारचे बचत खाते उघडण्याची परवानगी देऊ शकते.

दुसऱ्या बँकेत खाते उघडणे: जर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार दोन स्वतंत्र बचत खाती चालवायची असतील, तर तुम्ही दुसऱ्या बँकेत दुसरे बचत खाते उघडू शकता. आजकाल अनेक बँका ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा देतात, ज्यामुळे हे सोपे होते.

advertisement

तुमच्या विशिष्ट गरजेनुसार आणि बँकेच्या नियमांनुसार कोणता पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, याची माहिती घेण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे नेहमीच उचित राहील.

मराठी बातम्या/मनी/
Saving Account: एका बँकेत दोन सेविंग अकाउंट उघडता येतात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल