रशिया-युक्रेन युद्ध, ट्रम्प यांच्या व्यापार धमक्या आणि जागतिक महागाईमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याला सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून पसंती दिली आहे. आज जागितक बाजारात सोनं-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
>> किमती वाढण्याची ३ मुख्य कारणं...
> भू-राजकीय तणाव आणि ट्रम्प यांची धमकी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला १०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. तसेच US-NATO मधील ग्रीनलैंड विवाद आणि वेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना झालेली अटक यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत सोने हे 'इन्शुरन्स' मानले जाते.
advertisement
> कमकुवत डॉलर आणि व्याजदर कपात: अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरात दोनवेळा कपात करण्याची शक्यता आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा बाँड्समधील परतावा घटतो आणि गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. त्यातच डॉलर कमकुवत झाल्याने सोने खरेदी करणे अधिक स्वस्त झाले आहे.
> सेंट्रल बँकांची मोठी खरेदी: जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँका विक्रमी प्रमाणात सोन्याचा साठा करत आहेत. सोन्याची उपलब्धता मर्यादित (Scarcity) असल्याने आणि वाढत्या मागणीमुळे किमती गगनाला भिडल्या आहेत.
> चांदीचाही धमाका!
केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही इतिहास घडवला आहे. चांदीच्या किमतीने १०० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. २०२५ मध्ये चांदीमध्ये १५० टक्क्यांची वाढ झाली होती, जी सोन्यापेक्षाही अधिक आहे.
> सोनं इतक महत्त्वाचं का?
सोन्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची कमतरता. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, जगात आतापर्यंत फक्त २,१६,२६५ टन सोने उत्खनन करण्यात आले आहे - जे तीन किंवा चार ऑलिंपिक स्विमिंग पूल भरण्यासाठी पुरेसे आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार अंदाजे ६४,००० टन सोने भूगर्भात शिल्लक आहे, परंतु पुढील काही वर्षांत ते देखील कमी होऊ लागेल.
एबीसी रिफायनरीचे निकोलस फ्रॅपेल म्हणतात, "सोने कोणाच्याही कर्जाशी, कंपनीच्या कामगिरीशी किंवा बाँडसारख्या देणग्यांशी जोडलेले नाही. ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे."
> भारतीयांकडे सोन्याचा खजिना!
मॉर्गन स्टेनलेच्या रिपोर्टनुसार, भारतीय कुटुंबांकडे सध्या ३.८ डॉलर ट्रिलियन किमतीचे सोने आहे, जे भारताच्या एकूण जीडीपीच्या साधारण ८९ टक्के इतके आहे. भारतात सणासुदीला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने सोन्याची मागणी कायम तेजीत असते. चीन देखील जगातील सोन्याचा मोठा ग्राहक आहे. चीनमध्ये चिनी नववर्षाच्या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढते.
