TRENDING:

Success Story : नोकरी सोडली, अडचणी आल्या पण हार नाही मानली, तृप्ती यांनी यशस्वी केला ज्वेलरी व्यवसाय, Video

Last Updated:

एकेकाळी नोकरी करत असलेल्या तृप्ती दहीवाले यांनी आज स्वतःच्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर ज्वेलरी व्यवसायात मोठं यश मिळवलं आहे.

advertisement
मुंबई: एकेकाळी नोकरी करत असलेल्या तृप्ती दहीवाले यांनी आज स्वतःच्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर ज्वेलरी व्यवसायात मोठं यश मिळवलं आहे. वसईत राहणाऱ्या तृप्तीने ज्वेलरी डिझाईनचा कोर्स करून त्याच क्षेत्रात काही काळ नोकरी केली. मात्र, मनात सतत काही तरी स्वतःचं करण्याची ओढ होती. म्हणून त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून थेट व्यवसायात उडी घेतली.
advertisement

व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या. अनेकांनी त्यांना हे क्षेत्र सोडण्याचा सल्ला दिला. नका करू, फारसे चालत नाही, अशा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी ऐकल्या. पण तरीही तृप्तीने हार मानली नाही. त्यांचे सर नेहमी म्हणायचे चेंज इज पेन. चेंज आला की पेन होतोच, पण त्यातूनच यश मिळतं. हे वाक्य तृप्तीच्या मनावर ठसलं आणि त्या त्या बदलाच्या वेदना सहन करत पुढे वाटचाल करत राहिल्या.

advertisement

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी “ती” झाली रिक्षाचालक

आज तृप्ती दहीवाले यांचा स्वतःचा ज्वेलरी शॉप आहे आणि त्या महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. त्यांचे दागिने संपूर्ण महाराष्ट्रात जातात आणि ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यांचा ब्रँड गुणवत्तेचा आणि विश्‍वासार्हतेचा परिपाठ बनला आहे.

तृप्ती सांगतात की, घरच्यांचा सपोर्ट नसता, तर हे शक्य झालं नसतं. त्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्या सर्व नवउद्योजक महिलांना सांगतात की, हो, व्यवसायात रिस्क असतो, अडचणी येतात, पण त्यानंतर जे समाधान मिळतं ते अमूल्य असतं. त्यामुळे भीऊ नका, धाडस करा. तुम्ही यशस्वी होणारच. तृप्ती दहीवाले यांची ही कहाणी आजच्या पिढीला धैर्य, मेहनत आणि चिकाटीने कोणतंही स्वप्न साकार करता येतं हे शिकवते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सोडली, अडचणी आल्या पण हार नाही मानली, तृप्ती यांनी यशस्वी केला ज्वेलरी व्यवसाय, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल