TRENDING:

जागतिक मंदीच्या धोक्यात आला सिक्रेट रिपोर्ट; 2025 मध्ये काय घडणार? ज्यामुळे सगळेच चकित होतील

Last Updated:

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असताना आणि व्यापार युद्धाच्या परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रांच्या नवीन अहवालाने भारतासाठी मोठी आशा निर्माण केली आहे. 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5% च्या दराने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरू शकतो.

advertisement
नवी दिल्ली: जागतिक स्तरावर मंदीची शक्यता आणि वाढत असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या नवीन अहवालात भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. या अहवालानुसार 2025 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5% च्या दराने वाढू शकते. ज्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपली स्थिती कायम राखेल.
News18
News18
advertisement

संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संघटनेने (UNCTAD) बुधवारी आपला ‘Trade and Development Report Update 2025’ अहवाल जारी केला. या अहवालात म्हटले आहे की 2025 मध्ये जागतिक आर्थिक विकास दर घटून केवळ 2.3% पर्यंत खाली येऊ शकतो. याचे मुख्य कारण जगभरातील वाढती आर्थिक अनिश्चितता, व्यापार धोरणातील बदल आणि आर्थिक अस्थिरता आहे.

advertisement

चीनचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका; सप्लायर्स विश्वास बसणार नाही असा गौप्यस्फोट

भारताच्या विकासाची ताकद

अहवालात नमूद केले आहे की भारतात आर्थिक वाढ सुरू राहील. कारण सरकार सार्वजनिक खर्चात वाढ करत आहे आणि रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात 0.25% ची कपात केली आहे. यामुळे केवळ देशांतर्गत वापरालाच आधार मिळणार नाही. तर खाजगी गुंतवणुकीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. जरी 2024 च्या 6.9% च्या तुलनेत 2025 मध्ये विकास दर थोडा कमी असेल. तरीही भारताची स्थिती मजबूत राहील.

advertisement

Gold Price: एका तासात सोन्याच्या भावात झाली अभूतपूर्व घटना, बाजारात खळबळ

दक्षिण आशियालाही मिळणार दिलासा

UNCTAD च्या अंदाजानुसार, संपूर्ण दक्षिण आशियामध्ये 2025 चा विकास दर 5.6% राहण्याची शक्यता आहे. याचे कारण महागाईत झालेली घट आणि कमकुवत आर्थिक धोरणे आहेत. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळेल. तथापि पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारखे काही देश मोठ्या कर्जाच्या बोजाखाली आणि महागड्या अन्नपदार्थामुळे दबावात राहू शकतात.

advertisement

संयुक्त राष्ट्रांचा सल्ला

UNCTAD ने म्हटले आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीपासून वाचवण्यासाठी देशांदरम्यान धोरणांचे उत्तम समन्वय, पारदर्शक व्यापार करार आणि परस्पर सहकार्य आवश्यक आहे. अहवालात असेही नमूद केले आहे की व्यापार तणाव आणि अस्थिर धोरणांमुळे गुंतवणुकीचा वेग मंदावत आहे. ज्यामुळे रोजगारावर परिणाम होत आहे.

मराठी बातम्या/मनी/
जागतिक मंदीच्या धोक्यात आला सिक्रेट रिपोर्ट; 2025 मध्ये काय घडणार? ज्यामुळे सगळेच चकित होतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल