TRENDING:

बाजारात ‘मल्टिबॅगर हंटर’; शेअर 80 टक्के आपटला, दिग्गजाने गुंतवले 33 लाख; आजची किंमत फक्त 30 रुपये

Last Updated:

Stock Market: 80 टक्क्यांहून अधिक घसरलेल्या एका मायक्रो-कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करून ‘मल्टिबॅगर हंटर’ विजय केडियांनी पुन्हा एकदा बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे. तोट्यात असलेल्या Mangalam Drugs मध्ये केलेली ही एंट्री अल्पकालीन नफ्यापेक्षा दीर्घकालीन संधीवर आधारित असल्याचे मानले जात आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: शेअरबाजारातमल्टिबॅगर हंटर’ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ गुंतवणूकदार विजय केडिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अडचणीत सापडलेल्या, पण भविष्यात मोठी झेप घेण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांवर दाव लावणे हीच त्यांची ओळख आहे. याच धर्तीवर त्यांनी नुकतीच अशी एक गुंतवणूक केली आहे, जी सामान्य गुंतवणूकदारांसाठी धाडसाची वाटू शकते.

advertisement

घसरत्या शेअरमध्ये केडियांची एंट्री

शेअरबाजारात एखादा स्टॉक वाढत असतो तेव्हा त्यामागे धावणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र सतत घसरत असलेल्या, ‘लाल निशाणात’ असलेल्या शेअर्सकडे बहुतेक गुंतवणूकदार पाठ फिरवतात. अशा वेळी अनुभवी गुंतवणूकदार मात्र वेगळा विचार करतात. विजय केडियांनीही असाच ‘कॉन्ट्रेरियनदाव लावत Mangalam Drugs & Organics Ltd. मध्ये गुंतवणूक केली आहे.

advertisement

बुल्क डीलद्वारे केडिया सिक्युरिटीजने या कंपनीचे 1,37,794 शेअर्स सरासरी 24.15 या दराने खरेदी केले. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 33.27 लाख इतकी आहे. विशेष बाब म्हणजे, केडियांनी जेव्हा हा शेअर घेतला, तेव्हा तो आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी 125 पेक्षा सुमारे 80 टक्क्यांनी खाली होता. त्यामुळेच या व्यवहाराने बाजारात लक्ष वेधून घेतले आहे.

advertisement

मल्टिबॅगर हंटरम्हणून ओळख

विजय केडियांची गुंतवणूक पद्धत नेहमीच वेगळी राहिली आहे. सध्या तोट्यात असलेल्या किंवा अडचणीत सापडलेल्या कंपन्यांमध्ये भविष्यातील मोठी संधी ते शोधतात. Mangalam Drugs चा शेअर आज अनेकांनावेल्थ डिस्टॉयरवाटत असला, तरी केडियांसाठी तो भविष्यातीलमल्टिबॅगरठरू शकतो, असा त्यांचा अंदाज असण्याची शक्यता आहे.

advertisement

SMILE फिलॉसॉफीचा आधार

केडियांची गुंतवणूक त्यांची प्रसिद्ध ‘SMILE’ फिलॉसॉफीवर आधारित असते. त्याचा अर्थ असा

S (Small in Size) : कंपनी आकाराने लहान असावी

M (Medium in Experience) : अनुभव मध्यम, पण ठोस असावा

I (Large in Aspiration) : मोठी महत्त्वाकांक्षा असावी

L (Extra-Large Market Potential) : बाजारातील संधी प्रचंड असावी

Mangalam Drugs या निकषांमध्ये बसणारी कंपनी आहे. ही एक मायक्रो-कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप सुमारे 40-42 कोटींच्या आसपास आहे. 1977 पासून कार्यरत असल्याने कंपनीकडे जवळपास 50 वर्षांचा अनुभव आहे. ती केवळ स्थानिक बाजारापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या दिशेनेही पाहत आहे. विशेषतः फार्मा आणि API (Active Pharmaceutical Ingredients) क्षेत्रात बाजाराची क्षमता मोठी आहे.

तोट्यात असली तरी ‘वॅल्यू’ दडलेली?

आर्थिक आकडे पाहिले तर Mangalam Drugs सध्या अडचणीत आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) कंपनीला 7.35 कोटींचा निव्वळ तोटा झाला असून महसुलातही सुमारे 38 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र केडियांनी केवळ आकड्यांकडे न पाहता बॅलन्स शीटमागील दडलेली ताकद ओळखली असावी.

कंपनी आशियातील मलेरियाविरोधी औषधांच्या (Anti-Malaria APIs) प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. WHO-GMP, EDQM आणि ANVISA यांसारखी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे कंपनीकडे आहेत, जी सहज मिळत नाहीत आणि त्यांची ‘रिप्लेसमेंट व्हॅल्यू’ही मोठी मानली जाते. Clinton Health Access Initiative (CHAI) सारख्या जागतिक संस्थांशी कंपनीचे संबंध आहेत. गुजरातमधील वापी येथे आधुनिक उत्पादन प्रकल्प आणि इन-हाऊस R&D लॅब हीही तिची मोठी जमेची बाजू आहे.

सामान्य गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?

विजय केडियांची ही गुंतवणूक अल्पकालीन नफ्यासाठी नसून दीर्घकालीन दृष्टीकोनातून केलेली आहे. ‘Margin of Safetyजास्त आणि जोखीम तुलनेने कमी असल्याचा त्यांचा अंदाज असू शकतो. मात्र सामान्य गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केडियांसाठी ही गुंतवणूक त्यांच्या एकूण पोर्टफोलिओचा अगदी छोटा भाग असू शकते. तुमच्यासाठी मात्र ती संपूर्ण बचत ठरू शकते.

म्हणूनच अशा ‘पिटलेल्या शेअर्स’मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास, जोखीम मूल्यांकन आणि आर्थिक क्षमता तपासणे अत्यावश्यक आहे. केडियांचे पाऊल प्रेरणादायी असले, तरी अंधानुकरण टाळणेच शहाणपणाचे ठरेल.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
बाजारात ‘मल्टिबॅगर हंटर’; शेअर 80 टक्के आपटला, दिग्गजाने गुंतवले 33 लाख; आजची किंमत फक्त 30 रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल