बँक चेकचे अनेक प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. तुम्ही कधी स्टेल आणि पोस्ट डेटेड चेकबद्दल ऐकले आहे का? अनेकदा लोकांमध्ये या दोन चेकमधील फरकाबाबत काही कंफ्यूजन असते. याविषयीच आज आपण जाणून घेऊया.
Post Dated Cheque
पोस्ट-डेटेड चेक म्हणजे असे चेक जे काही दिवसांनी एका तारखेसाठी जारी केले जातात. हा क्रॉस्ड पेई किंवा अकाउंट पेई चेक आहे. चेकची तारीख कोणतीही असो, तो त्या तारखेपासून पुढील 3 महिन्यांसाठी मान्य असतो.
advertisement
जेव्हा चेक जारी करताना तुमच्याकडे पुरेसा फंड उपलब्ध नसतो तेव्हा पोस्ट-डेटेड चेक सर्वोत्तम असतात. परंतु तुमच्याकडे चेकवर निर्दिष्ट केलेल्या तारखेला किंवा अंतिम मुदतीवर फंड असेल याची खात्री असते.
PF Update: तुमच्या PF अकाउंटमध्ये कधी जमा होईल पैसा? पाहा EPFO ने काय म्हटलं
Stale Cheque
स्टेल चेक हे असे चेक आहेत जे जारी केल्याच्या तारखेपासून पुढील 3 महिन्यांसाठी भरले जात नाहीत. अशा स्थितीत त्यांची मुदत संपते. जेव्हा एखादी व्यक्ती मुदत संपल्यानंतर पैसे भरण्यासाठी बँकेला चेक देते, तेव्हा बँक त्याचे पैसे देत नाही. कालबाह्य झालेल्या चेकला स्टेल चेक म्हणतात.
Saving Account असेल ना? मग करु नका ही चूक, एका वर्षात बंद होऊ शकतं अकाउंट
Ante-dated Cheque
अँटी-डेटेड चेक, जो पोस्ट-डेटेड तारखेला जारी केला जातो. जर अशा चेकची 3 महिन्यांची व्हॅलिडिटी शिल्लक असेल, तर तो पेमेंटसाठी बँकेत दिला जाऊ शकतो. लक्षात ठेवा की अँटी डेटेड चेक एवढ्या जुन्या तारखेला जारी केला जाऊ नये की, तो यापुढे व्हॅलिड राहणार नाही. कारण चेक सामान्यतः जारी झाल्यानंतर 3 महिन्यांसाठी वैध असतो.
