पोस्ट ऑफिस
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के इतका सर्वाधिक व्याजदर देत आहे. देशातील इतर कोणतीही बँक 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज देत नाही. खरंतर, सर्व वयोगटातील पोस्ट ऑफिस ग्राहकांना समान व्याजदर मिळतो.
तुमचंही बँक अकाउंट दीर्घकाळापासून बंद आहे? या ट्रिकने झटपट करा रिअॅक्टिव्हेट
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, SBI, आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 6.05% ते 7.05% व्याज देते. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक सामान्य ग्राहकांना 6.05% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.05% व्याज देते.
HDFC Bank
मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी बँक, HDFC बँक, आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 6.40% ते 6.90% व्याज देते. ही खाजगी बँक सामान्य ग्राहकांना 6.40% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.90% व्याज देते.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB), आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 6.25% ते 7.05% व्याज देते. ही सरकारी बँक सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 7.05 टक्के व्याज देत आहे.
