माया टाटा 36 वर्षांच्या असून त्यांच्याबद्दल विशेष चर्चा आहे. माया टाटा यांनी टाटा कॅपिटलपासून आपलं करिअर सुरू केलं होतं. तसंच, टाटा न्यू अॅप मॅनेज करणाऱ्या टीममध्येही त्या आहेत.
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल? नव्हे इनकम टॅक्स ऑफिसर म्हणा, मिळतो इतका पगार
सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटची स्थापना 1928 साली लेडी नवाजबाई टाटा यांनी गरीब महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी केली होती. त्यातून कुकिंग, शिलाई, माँटेसरी शिक्षक प्रशिक्षण युनिट असं प्रशिक्षण देण्यासाठी अनेक अॅक्टिव्हिटीज सुरू करण्यात आल्या आहेत. या बोर्डच्या अन्य ट्रस्टीजमध्ये फरिदा टाटा, मेहनोश कपाडिया, धन खुसरोखान यांचा समावेश आहे. टाटा ट्रस्ट्सच्या छोट्या ट्रस्ट्समध्ये नव्या पिढीच्या समावेशामुळे त्यांच्या ग्रुप पातळीवर मोठ्या भूमिकांसाठी तयार होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
...तर भारतातील ९९% लोक दुसऱ्या दिवशी कामावर जाणार नाहीत
म्हणूनच टाटा ग्रुपमध्ये नव्या पिढीला समाविष्ट करून घेतलं जात आहे. माध्यमांपासून दूर राहणाऱ्या माया टाटा यांना मोठ्या जबाबदारीसाठी तयार केलं जात आहे. माया टाटा या नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांच्या कन्या आहेत. अलू या पालनजी मिस्त्री यांची कन्या असून, टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहीण. सायरस यांचा काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मिस्त्री परिवाराकडे टाटा ग्रुपच्या टाटा सन्स या कंपनीची 18.4 टक्के भागीदारी आहे.
माया टाटा यांनी ब्रिटनचं बेयस बिझनेस स्कूल आणि वॉर्विक विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड या कंपनीतून करिअरला सुरुवात केली होती. कॉर्पोरेट जगताचं गुंतागुंतीचं डायनॅमिक्स समजून घेऊन माया यांनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टर्स रिलेशन या विषयांमधलं आपलं कौशल्य वृद्धिंगत केलं. हा फंड अचानक बंद झाल्यानंतर माया यांचं करिअर टाटा डिजिटलकडे गेलं. त्यांनी टाटा न्यू अॅप सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
हा एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म असून, तो खरेदीदारांना चांगला अनुभव देतो. नव्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर माया यांचं नेतृत्व फार महत्त्वाचं आहे. टाटा ग्रुपच्या बदलत्या स्वरूपात ही बाब महत्त्वाची आहे. माया यांच्या नेटवर्थबद्दल सार्वजनिक रूपाने माहिती उपलब्ध नाही. तरीही माध्यमांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वडील नोएल टाटा यांची नेटवर्थ 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 12,889 कोटी रुपये आहे.
