या दोन गोष्टी द्या, भारतातील ९९% लोक दुसऱ्या दिवशी कामावर जाणार नाहीत- शांतनू देशपांडेंची पोस्ट व्हायरल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Shantanu Deshpande Post:भारतातील बहुतेक लोकांना त्यांची नोकरी आवडत नाही. जे लोक नोकरी करतात त्यातील बरेच जण नोकरी आनंदाने करत नाहीत. ते फक्तआपल्या कुटुंबासाठी नोकरी करतात.
मुंबई: बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शांतनू देशपांडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे शांतनू यांची चर्चा होत आहे. लिंक्ड इनवर शांतनू यांनी भारतातील वर्क कल्चरबद्दल आपले स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या मते भारतातील बहुतेक लोकांना त्यांची नोकरी आवडत नाही. जे लोक नोकरी करतात त्यातील बरेच जण नोकरी आनंदाने करत नाहीत. ते फक्तआपल्या कुटुंबासाठी नोकरी करतात.
लिंक्ड इनवर शेअर केलेली शांतनू देशपांडे यांची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते म्हणतात की, भारतातील बहुतांश लोकांना त्यांच्या कामातून आनंद मिळत नाही. जर या लोकांना त्यांच्या सध्याच्या नोकरीतून मिळणारे भत्ते आणि आर्थिक सुरक्षितता दिली गेली, तर 99% लोक आपली नोकरी सोडून दुसऱ्या दिवसापासून कामावर येणार नाहीत.
One Nation One Electionवर मोठी अपडेट; देशातील इतक्या टक्के लोकांना वाटते...
वेगवेगळ्या क्षेत्रात ही परिस्थिती आहे. ब्लू-कॉलर वर्कर्स, सरकारी कर्मचारी, गिग वर्कर्स, फॅक्टरी कर्मचारी, विमा एजंट, बँक कर्मचारी इतक काय तर माझ्या कंपनीतील कर्मचारीसुद्धा असेच आहेत. परिस्थिती सर्वत्र एकसारखीच आहे.
advertisement
हा तर शुद्ध वेडेपणा...
या पोस्टमध्ये शांतनू देशपांडे यांनी भारतातील संपत्ती आणि कर प्रणालीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. भारतातील 2 हजार कुटुंबांकडे देशाच्या संपत्तीपैकी 18% हिस्सा आहे. हे कुटुंब 1.8% पेक्षाही कमी कर भरतात. हे प्रकार म्हणजे वेडेपणाआहे.
हे कोडे सोडवा आणि 8.5 कोटींचे बक्षीस जिंका, 100 वर्षे उत्तर सापडले नाही
अशा प्रकारची वक्तव्य करून चर्चेत येण्याची शांतनू यांची ही पहिली वेळ नाही. याआधी उद्योगासाठी दिल्ली हे बेंगळूरूपेक्षा १ हजार टक्के अधिक चांगले असल्याचे म्हटले होते. हे वक्तव्य तेव्हा करण्यात आले होते जेव्हा झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी बेंगळुरूला जाण्याची गरज नाही असे म्हटले होते. तर त्याधी 10 मिनिटांत फूड डिलिव्हरीवरही प्रश्न उपस्थित केले होते.घरी बनवण्यासाठी तासाभराहून जास्त वेळ लागणारे जेवण 10 मिनिटांत कसे डिलिव्हर होऊ शकते? अशा प्रकारच्या सेवा जेवण लवकर पोहोचवण्यावर लक्ष देतात. त्यामुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते असे त्यांनी म्हटले होते.
advertisement
नेटवर्थ 100 कोटींपेक्षा अधिक
बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या शांतनू देशपांडे यांची नेटवर्थ 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. एका अहवालानुसार त्यांची नेटवर्थ ही 167.4 कोटी रुपये आहे. जून 2023 च्या माहितीनुसार कंपनीत त्यांचा 21.1% हिस्सा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
या दोन गोष्टी द्या, भारतातील ९९% लोक दुसऱ्या दिवशी कामावर जाणार नाहीत- शांतनू देशपांडेंची पोस्ट व्हायरल