हे कोडे सोडवा आणि 8.5 कोटींचे बक्षीस जिंका, 100 वर्षे उत्तर सापडले नाही, आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Last Updated:

Indus Valley Script: 100 वर्षांपूर्वी शोध लागलेल्या सिंधू संस्कृतीची गूढ लिपी आजपर्यंत कोणाला कळाली नाही. या लिपीचे कोडे उलघडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला 8.5 कोटी रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

News18
News18
चेन्नई: सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली 1920च्या दशकात प्राचीन सिंधू संस्कृतीची गूढ लिपी शोधून काढली होती. त्यानंतर ही लिपी अद्याप कोणालाही उलघडता आलेली नाही. आता यासाठी तब्बल १० लाख अमेरिकन डॉलर्सचे (8.5 कोटी रुपये) बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
हे कोडे सोडविण्यासाठी विद्वानांचा प्रयत्न आजही सुरू आहे आणि अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी व्यक्ती किंवा संस्थेला 10 लाख अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक जाहीर केले आहे.
सिंधू संस्कृतीची लिपी गेल्या शतकभरापासून न सुटलेले कोडेच राहिले आहे. कधीकाळी फुललेलीसिंधू संस्कृतीची लिपी आपल्याला अजूनही स्पष्टपणे समजलेली नाही. सिंधू संस्कृती (इ.स.पू. 3300 ते 1300) उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतीय उपखंडात 5000 वर्षांपूर्वी फुलली होती. जर ही लिपी डिकोड झाली तर सिंधू संस्कृतीचा खरा इतिहास तसेच तिचे सामाजिक आणि आर्थिक संबंध उलगडले जाऊ शकतील. यामुळे सिंधू संस्कृतीच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे स्थलांतराचा शोध लागेल.
advertisement
पृथ्वीच्या पोटात आहे 'गोल्ड फॅक्टरी', सोने कसे तयार होते? भूकंपामुळे...
सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा उल्लेख सर्वप्रथम 7व्या शतकात आढळतो. पंजाबमधील लोकांनी विटा बनवण्यासाठी मातीची उत्खनन करताना तयार विटा सापडल्या आणि त्यांनी त्याला देवाचा आशीर्वाद मानले. यानंतर सिंधू घाटीच्या अनेक शहरांचा शोध लागला. ज्यामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल आणि कालीबंगा यांचा समावेश आहे. मात्र, या सभ्यतेची भाषा आजतागायत वाचता आलेली नाही.
advertisement
बक्षीस जाहीर करण्यामागे राजकीय हेतू?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे सिंधू संस्कृतीच्या भौगोलिक क्षेत्रापासून हजारो किलोमीटर दूर आहेत. तरी त्यांनी यासाठी इतके मोठे बक्षीस का जाहीर केले असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्टॅलिन यांचा प्रयत्न स्वतःला द्रविड संस्कृतीचा रक्षक म्हणून सिध्द करण्याचा आणि भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचा असल्याची टीका देखील होत आहे.
advertisement
सर जॉन मार्शल यांनी 1921 मध्ये सिंधू संस्कृतीच्या पहिल्या शहरी स्थळाच्या उत्खननाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या या शोधानंतर सिंधू संस्कृती आर्य संस्कृती (वैदिक काळ) आधीची आहे आणि सिंधू संस्कृतीत बोलली जाणारी भाषा द्रविडीयन असू शकते, याला अधिक बळकटी मिळाल्याचा दावा स्टॅलिन यांनी यावेळी केला.
मराठी बातम्या/देश/
हे कोडे सोडवा आणि 8.5 कोटींचे बक्षीस जिंका, 100 वर्षे उत्तर सापडले नाही, आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement