How Gold Made: पृथ्वीच्या पोटात आहे 'गोल्ड फॅक्टरी', सोने कसे तयार होते? भूकंपाशी थेट कनेक्शन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
How Gold Is Made: जगातील सर्वात महाग आणि भरवशाचा धातू म्हणून सोन्याची ओळख आहे. हे सोने कसे तयार होते याबाबत नवे संशोधन समोर आले आहे.
कॅनबेरा: भारतीय लोकांना सोन्याचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. फक्त अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडणारे म्हणून नव्हे तर भारतीय लोक हौस म्हणून देखील सोनं स्वत:कडे ठेवतात. भारतात सोन्याचा मोठ्या प्रमाणात साठा देखील आहे. जगात फक्त भारतच नाही तर अन्य देशात देखील सोन्याबाबत प्रचंड आकर्षण आहे. हे आकर्षण असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे मुल्य होय. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा सोन्यातील गुंतवणूक ही फायद्याची ठरते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या सोन्याची निर्मिती होते तरी कशी?
जमिनीखाली सोने तयार होण्याच्या प्रक्रियेबाबत एक नवीन आणि रोचक शोध समोर आला आहे. मोनाश विद्यापीठातील वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे की क्वार्ट्ज पासून (सिलिकापासून बनलेले कठोर, स्फटिकासारके खनिज) सोन्याची निर्मिती कशी होते. नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाने 'गोल्ड नगेट पॅराडॉक्स'चा गुंता सोडवला आहे. या संशोधनामध्ये सोने तयार होण्याच्या प्रक्रियेवर भूकंपाचा परिणाम कसा होतो याबद्दलही माहिती दिली आहे.
advertisement
निर्णय घ्यावा तर गडकरींनीच! १ हजार २०० कोटी रुपयांची केली बचत
मोनाश विद्यापीठाच्या प्रयोगांमध्ये भूकंप आणि सोने तयार होण्याच्या प्रक्रियेवर अनेक तथ्ये उघडकीस आली आहेत. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, वैज्ञानिकांनी प्रयोगादरम्यान भूकंपीय प्रक्रियेची नक्कल केली आणि क्वार्ट्जपासून सोने तयार केले. भूकंपाच्या वेळी निर्माण होणारा ताण (दबाव) मुळे निर्माण झालेल्या विद्युत क्षेत्राने क्वार्ट्जच्या पृष्ठभागावर सोन्याचे छोटे-छोटे कण सोडले.
advertisement
भूकंपाच्या वेळी क्वार्ट्जमध्ये तडे जातात आणि या तड्यांमध्ये खोलवर सोने तयार होते. भूकंपाच्या तीव्र दाबामुळे क्वार्ट्जमध्ये विद्युत क्षेत्र तयार होते, ज्यामुळे सोने तयार होते. या प्रक्रियेस पीझोइलेक्ट्रिक इफेक्ट असे म्हणतात.
शरिराच्या आत लपवले 12 कोटींचे कॅप्सूल, डॉक्टरांनी बाहेर काढले
या अभ्यासातून सोने मोठ्या प्रमाणावर कसे तयार होते याबाबत देखील नवी माहिती मिळाली आहे. यामुळे क्वार्ट्जमधील सोने तयार होण्याच्या गुंतागुंतीच्या जाळ्यांबद्दल अधिक माहिती समोर आली. भूकंपामुळे जमिनीखाली सोने तयार होण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश पडतो. यामुळे सोने तयार होण्याच्या पारंपरिक समजुतींना बदलू शकते आणि नवीन सोने साठे शोधण्यातही मदत करू शकते. यामुळे पीझोइलेक्ट्रिक इफेक्टबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा मार्ग मोकळा होतो.
advertisement
क्वार्ट्ज आणि सोने तयार होण्याची प्रक्रिया
क्वार्ट्ज हा सिलिकॉन आणि ऑक्सिजनपासून बनलेला पृथ्वीखाली आढळणारा स्फटिकीय खनिज आहे. भूकंप आणि हायड्रोथर्मल द्रवांच्या प्रक्रियेने क्वार्ट्ज सोने बनवू शकतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाखालून हायड्रोथर्मल द्रव क्वार्ट्जमध्ये प्रवेश करतात आणि त्यात सोने विरघळलेले असते. भूकंपाचा दबाव क्वार्ट्जमधील घटकांना दाबतो, ज्यामुळे विद्युत क्षेत्र तयार होते. हे विद्युत क्षेत्र आणि दाब सोने तयार करण्याची प्रक्रिया पुढे नेतात.
advertisement
कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोने
जगातील सोने साठ्यांच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. अमेरिकेकडे 8 हजार 133 टन सोने आहे. त्यानंतर जर्मनीचा नंबर लागतो, त्यांच्याकडे 3 हजार 353 टन इतके सोने आहे. इटलीकडे 2 हजार 452 टन, फ्रान्सकडे 2 हजार 437 टन आणि पाचव्या क्रमांकावर रशियाकडे 2 हजार 335 टन सोने आहे. भारत या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. भारताच्या सरकारी खजिन्यात 840 टन सोने आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 4:44 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
How Gold Made: पृथ्वीच्या पोटात आहे 'गोल्ड फॅक्टरी', सोने कसे तयार होते? भूकंपाशी थेट कनेक्शन