शरिराच्या आत लपवले 12 कोटींचे कॅप्सूल, डॉक्टरांनी बाहेर काढले, सत्य समजताच पोलीसही हादरले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Delhi News: दिल्लीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या व्यक्तीकडे तब्बल १२ कोटींचे कोकीन सापडले आहे.
नवी दिल्ली: हवाई मार्गे अनेक गोष्टींची तस्करी केली जाते. अशा तस्करी किंवा बेकायदेशीर पद्धतीने आणल्या जाणाऱ्या गोष्टी सुरक्षा रक्षकांच्या हाती लागू नये म्हणून अनेक युक्त्या केल्या जातात. अशाच प्रकारची एक धक्कादाक प्रकार दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर समोर आला. हा प्रकार पाहून कस्टम अधिकारी देखील चक्रावले.
दिल्ली विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केनियाच्या एका नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्या संशयास्पद हलचालींवरून तपासणी केली असता अधिकाऱ्यांची झोप उडाली. राजधानी नवी दिल्लीत आलेल्या एका विमानातून मुळच्या केनियाच्या नागरिकाकडून 822 ग्रॅम कोकीन जप्त करण्यात आले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 12.33 कोटी इतकी आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित व्यक्तीने त्याच्या शरीरात ७७ कॅप्सूलमध्ये हे कोकीन लपवले होते. ही घटना 17 डिसेबरची असून याबाबत कस्टम अधिकाऱ्यांनी आज 6 डिसेंबर रोजी माहिती दिली.
advertisement
चीनी व्हायरसने शेअर बाजाराने १२ वाजवले, गुंतवणुकदारांचे ११ लाख कोटी पाण्यात
दिल्ली विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. 17 डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांना विमानतळावर मुळचा केनियाचा असलेल्या एका नागरिकाच्या हलचाली संशयास्पद वाटल्या. अधिकाऱ्यांनी त्याला रोखले आणि चौकशी केली तर काही संशय अजून वाढला. संबंधित व्यक्ती केनियाची राजधानी नैरोबीतून आला होता.
advertisement
8400 कोटींना विकली कंपनी,आता म्हणतोय काय करू?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही व्यक्ती ग्रीन चॅनलच्या माध्यमातून वेगाने विमानतळाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय वाढला. अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले आणि चौकशी केली. चौकशीत त्या व्यक्तीनेच कबूल केले की आपण शरीरात अंमली पदार्थ लपवले आहेत. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सफदरजंग रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या शरीरात अनेक कॅप्सूल दिसले. डॉक्टरांना त्याच्या शरीरातून 77 कॅप्सूल बाहेर काढले. ज्यात पांढरी पावडर होती. त्याची तपासणी केल्यानंतर कोकीन असल्याचे समोर आले. या कोकीनचे वजन 822 ग्रॅम होते. ज्याची अंदाचे किंमत 12.33 कोटी इतकी होते.
advertisement
🌍 Smuggling of 822 grams cocaine worth Rs 12.33 crores Foiled at IGI Airport! 🚨
In a remarkable operation showcasing the vigilance and commitment of India’s Customs officers, a Kenyan national attempting to smuggle narcotic substances was intercepted at IGI Airport, New Delhi.… pic.twitter.com/YcZw1xFF0A
— Delhi Customs (Airport & General) (@AirportGenCus) January 6, 2025
advertisement
संबंधित व्यक्तीकडे सापडलेले कोकीन अंमली पदार्थ NDPS कायदा 1985च्या कलम 43 A नुसार जप्त करण्यात आले आहेत. त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 06, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
शरिराच्या आत लपवले 12 कोटींचे कॅप्सूल, डॉक्टरांनी बाहेर काढले, सत्य समजताच पोलीसही हादरले