Share Market Crash: चीनी व्हायरसने शेअर बाजाराचे १२ वाजवले, गुंतवणुकदारांचे ११ लाख कोटी पाण्यात

Last Updated:

Sensex And Nifty: HMPV व्हायरसचे देशात रुग्ण साडपल्याच्या वृत्ताचा पडसाद शेअर बाजारावर झाले. आठवड्याच्या तेजीसह सुरू झालेल्या बाजारात सोमवारी मोठा भूकंप झाला.

News18
News18
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज मोठा भूकंप झाला. करोना सारखा HMPV व्हायरसचे देशात रुग्ण आढळल्याने आठवड्याच्या सुरुवातीला तेजीत सुरू झालेला बाजार काही तासानंतर जोरदार खाली आला. अशात तिमाही निकालाबाबत असलेल्या शंकेची आणि जागतिक बाजारपेठेतील बंदीची भर पडली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार २५८ अंकांनी घसरून बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 23 हजार ६१६वर आला. निफ्टीमध्ये ३८८.७० अंकांची घसरण झाली.
शेअर बाजारात आज दिवसभरात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे १०.८३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएससी मिडकॅप इंडेक्स २.४४ टक्के, स्मॉलकॅप इंडेक्स ३.१७ टक्के घसरणीसह बंद झाला. इतक नाही तर बीएससी सेक्टोरल इंडेक्स देखील मोठी घसरण झाली. युटिलिटी, मेटल, रियल्टी, पॉवर आणि ऑइल तसेच गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.
advertisement
कोण आहे विनय हिरेमठ? 8400 कोटींना विकली कंपनी, आता म्हणतोय...
बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स १ हजार २५८.१२ म्हणजे १.५९ टक्क्यांनी घसरून ७७ हजार ९६४.९९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ३८८.७० अंकांनी म्हणजे १.६२ टक्क्यांच्या घसरणीसह २३ हजार ६१६.०५ अंकांवर बंद झाला.
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप घसरले आणि ते ४३९.०३ लाख कोटींवर पोहोचले. शुक्रवारी हेच मार्केट कॅप ४४९.७८ लाख कोटी इतके होते. बाजारातील गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १०.८३ लाख कोटी रुपयांची घसरण झाली.
advertisement
सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ३ शेअर तेजीतहोते. ज्यात टायटन, एससीएल टेक आणि सन फार्मा यांचा समावेश होता. तर बाजारातील ४ हजार २४४ पैकी ६५७ शेअर तेजीसह बंद झाले आणइ ३ हजार ४७१ शेअर घसरणीसह बंद झाले.
मराठी बातम्या/मनी/
Share Market Crash: चीनी व्हायरसने शेअर बाजाराचे १२ वाजवले, गुंतवणुकदारांचे ११ लाख कोटी पाण्यात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement