BJP : दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, संध्याकाळी माजी आमदाराची भाजपात घरवापसी, शरद पवारांना मोठा झटका
- Reported by:Tushar Rupanwar
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नवी मुंबईच्या राजकारणातुन मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे
Sandeep Naik Join BJP : नवी मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. दरम्यान आता नवी मुंबईच्या राजकारणातुन मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. विशेष म्हणजे संदीप नाईक यांनी आज दुपारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.या भेटीनंतर संध्याकाळी त्यांनी भाजपात घरवापसी केली आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संदीप नाईक कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. आणि संध्याकाळी तसेच घडले. संध्याकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश पार पडला. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे गणेश नाईक यांची ताकद वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून लढली होती.या निवडणूकीत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा पराभव केला होता.
advertisement
दरम्यान जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी या प्रवेशाला विरोध दर्शवला होता.मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना पक्षात घेणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र गणेश नाईक यांनी रात्री सुत्रे हलवत हा प्रवेश घडवून आणला आहे.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 11:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, संध्याकाळी माजी आमदाराची भाजपात घरवापसी, शरद पवारांना मोठा झटका











