TRENDING:

इंजिनिअरिंग चिकनवाला, विकतोय 150 रुपयांत चिकन थाळी, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

तेजल कदम यांनी इंजिनिअरिंगनंतर वेगळा मार्ग निवडत, व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी सुरू केलेल्या रयत खानावळच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपले पाऊल भक्कम रोवले आहे.

advertisement
पुणे : शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. मात्र पुण्यातील तेजल कदम यांनी इंजिनिअरिंगनंतर वेगळा मार्ग निवडत, व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी सुरू केलेल्या रयत खानावळच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपले पाऊल भक्कम रोवले आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना तेजल कदम यांनी दिली.
advertisement

तेजल कदम यांनी पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केली. मात्र इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खाद्यपदार्थांची आवड असल्याने तेजल यांनी हॉटेल क्षेत्रात व्यवसाय करण्याचे ठरवले. 2017 साली त्यांनी धायरी परिसरात रयत प्युअर नॉन व्हेज ह्या नावाने स्वतःचे हॉटेल सुरू केले.

Winter Recipe : हिवाळ्यात जेवणाची वाढेल चव, घरीच बनवा हिरव्या मिरचीचे लोणचे, रेसिपीचा संपूर्ण Video

advertisement

त्याचवेळी तेजल हे स्पर्धा परीक्षेचा देखील अभ्यास करत होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तेजल यांचे पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात नेहमी येणे-जाणे असायचे. पुढे 2019 मध्ये त्यांनी सदाशिव पेठेत देखील रयत प्युअर व्हेजची दुसरी शाखा सुरू केली. तेजल आणि रयत खानावळीच्या माध्यमातून सामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक, चविष्ट आणि परवडणाऱ्या जेवणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

advertisement

तेजल कदम यांनी सांगितले की, शहरात वाढत्या खानावळी आणि रेस्टॉरंटमध्ये किमती फार वाढल्या आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, बाहेरगावचे कामगार तसेच कमी बजेटमध्ये पौष्टिक जेवण शोधणारे लोक यांच्याकडे मर्यादित पर्याय असतात. ही अडचण लक्षात घेऊन स्वस्त दरातील मटन थाळी आणि चिकन थाळी पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

advertisement

काय आहेत भाव?

रयत प्युअर नॉनव्हेज हॉटेलमध्ये भाव अगदी मुबलक दरात आहेत. चिकन थाळी 150 रुपये, मटन थाळी 230 रुपये तर फक्त 80 रुपयात अनलिमिटेड पावभाजी आणि मिसळ देखील आता उपलब्ध करून दिली आहे.

सध्या तेजल यांच्या खानावळीत दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असून चव, स्वच्छता आणि प्रामाणिक सेवेमुळे रयत खानावळची ओळख झपाट्याने वाढत आहे. तेजल यांना स्वयंपाकाची विशेष आवड असून घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले, ताजी सामग्री आणि ग्रामीण भागातील पारंपरिक चव हे त्यांच्या थाळीचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
इंजिनिअरिंग चिकनवाला, विकतोय 150 रुपयांत चिकन थाळी, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल