TRENDING:

Mumbai :...म्हणून विमानाने सोन्याची तस्करी होते, 1 किलोसाठी मिळतात इतके पैसे!

Last Updated:

त्यांनी कर्ज घेऊन परदेशात हे सोनं घेतलं होतं. त्यानंतर त्या मुंबईच्या विमानात बसल्या. मुंबईत सोनं विकल्यानंतर मोठा नफा होतो, असं या दोघींना वाटत होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत सोनं विकल्यावर मोठा नफा होतो, असं सांगून परदेशातून सोन्याची तस्करी करून घेऊन आलेल्या केनियाच्या दोघींना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. नजमा मोहंमद आणि खदिजा तुळु अशी त्यांची नावं असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
(मुंबई विमानतळावरील घटना)
(मुंबई विमानतळावरील घटना)
advertisement

मुंबईत गेल्या महिनाभरात सोन्याच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. यात अनेक परदेशी नागरिकांना अटक झाली आहे. रविवारी (25 फेब्रुवारी) कस्टम विभागानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या तपास मोहिमांमध्ये केनियाच्या दोन महिलांना अटक केली आहे. नजमा मोहंमद आणि खदीजा तुळु नावाच्या या महिलांकडून अडीच-अडीच किलो सोनं हस्तगत करण्यात आलं आहे. दोघींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघींनी जामिनाचा अर्ज कोर्टात दिला असल्याचं ॲड. प्रभाकर त्रिपाठी यांनी सांगितलं.

advertisement

या दोन महिलांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी कर्ज घेऊन परदेशात हे सोनं घेतलं होतं. त्यानंतर त्या मुंबईच्या विमानात बसल्या. मुंबईत सोनं विकल्यानंतर मोठा नफा होतो, असं या दोघींना वाटत होतं. एक किलो सोन्यावर जवळपास 15 लाखांचा नफा होतो. मुंबईत जर त्यांना हे सोनं विकता आलं असतं, तर केनियामध्ये जाऊन त्यांना त्यांचं कर्ज फेडता आलं असतं आणि उर्वरित पैशांत काही वर्षं चांगलं जीवन जगायचं होतं.

advertisement

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, केनियामधून सोन्याचा कच्चा माल अधिकृतपणे दुबईमध्ये नेला जातो. तिथे या सोन्याला बिस्किटांचं रूप दिलं जातं. दुबईहून सोन्याची बिस्किटं पुन्हा केनियाला पाठवली जातात आणि सामान्य माणसं ती बिस्किटं कर्ज घेऊन खरेदी करतात. मग जास्त पैशांच्या हव्यासापोटी भारतासह ज्या देशांमध्ये मोठा नफा मिळू शकतो, तिथे हे सोनं विकलं जातं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दररोजच्या जेवणात तिच भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा दहीतडका, रेसिपीचा Video
सर्व पहा

मुंबईमध्ये गेल्या चार वर्षांत 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोनं हस्तगत करण्यात आलं आहे. त्यावरूनच लक्षात येऊ शकतं की, परदेशातून मुंबईत किती मोठ्या प्रमाणावर सोनं तस्करी होऊ शकते. खूपदा परदेशातले तस्कर त्यांच्या सामानात सोनं लपवून आणतात. बऱ्याचदा विमानतळाच्या आत स्वच्छतागृह किंवा मोबाइल सेंटरवर ठेवून एखाद्या विमानतळ कर्मचाऱ्याच्या मदतीनं ते विमानतळाच्या बाहेर आणलं जाते. मागच्या 15 दिवसांत मुंबईत अशा दोन घटना झाल्या आहेत. साठ आणि सत्तरच्या दशकात जेव्हा अंडरवर्ल्डचा उदय झाला नव्हता, तेव्हा त्यांच्या कमाईचं मुख्य साधनसुद्धा सोन्याची तस्करी हेच होतं. अंडरवर्ल्ड समुद्रमार्गे सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर करत होतं.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai :...म्हणून विमानाने सोन्याची तस्करी होते, 1 किलोसाठी मिळतात इतके पैसे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल