TRENDING:

Mumbai Dahi Handi 2025: 10 थर लागले पण 2 गोविंदा गेले, 11 वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश, दहीहंडी उत्सवाला गालबोट

Last Updated:

यंदा तर १० थर लावण्याचा भीम पराक्रमही गोविंदा पथकांनी करून दाखवला. पण, या उत्सवाला मात्र गालबोट लागलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम म्हणत तर कुठे डीजेच्या ठेक्यावर बेधुंंद होत गोविंदांनी थराचा थरार करून दाखवला. यंदा तर १० थर लावण्याचा भीम पराक्रमही गोविंदा पथकांनी करून दाखवला. पण, या उत्सवाला मात्र गालबोट लागलं. दहीहंडी उत्सवात 2 गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. तर संध्याकाळी ९ वाजेपर्यंत अनेक गोविंदा हे जखमी झाले. अनेकांवर उपचार सुरू आहे तर काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
News18
News18
advertisement

मुंबईतील मानखुर्दमध्ये दहीहंडीचा रोप बांधत असताना तोल गेल्याने एका ३२ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरमधील दहीहंडी मंडळाकडून दहीहंडी लावली जात असताना किंबहुना रोप बांधत असताना गोविंदाचा मृत्यू झाला. जगमोहन चौधरी असे मृत पावलेल्या गोविंदाचे नाव आहे. दहीहंडीचा रोप बांधत असताना जगमोहन चौधरी यांचा तोल गेल्याने ते काही उंच अंतरावरून खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शताब्दी रुग्णालयाने चौधरी यांना मृत घोषित केलेले आहे.

advertisement

सरावादरम्यान चिमुरड्या गोविंदाचा मृत्यू

तर ११ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दहीसरमधील केतकीपाडा परिसरात एका ११ वर्षीय गोविंदाचा करुन अंत झाला. दहिहंडीचा सराव करत असताना घडलेल्या अपघातात त्याचा जीव गेला. महेश रमेश जाधव असं मृत पावलेल्या ११ वर्षीय बाल गोविंदाचं नाव होतं.  महेश जाधव हा आपल्या गोविंदा पथकासोबत दहीहंडीच्या सरावात सहभागी झाला होता. याच सरावादरम्यान त्याचा अपघात झाला. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

advertisement

 दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांची माहिती (२१:०० वाजेपर्यंत प्राप्त माहिती)

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल गोविंदा -(एकूण - १२)

१)  आदित्य रघुनाथ वर्मा (पु / १८ वर्षे / राहणार - रूम नं. ११३, शिव साई चाळ, वाघोबा नगर, कळवा, ठाणे (पू.) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

पुढील उपचाराकरिता जे.जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

advertisement

२) कृष्णा मिठू स्वयन (पु / १३ वर्षे/ राहणार - रूम नं. ६३३/३६२, मिठू शेठ चाळ, मुंबई पुणे रोड, पारसिक नगर, मुंब्रा, ठाणे / एकता मित्र मंडळ) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.

उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

३) समर बन्सीलाल राजभर (पु / १० वर्षे / राहणार - लक्ष्मीवाडी, अतकोनेश्वर नगर, कळवा, ठाणे (पू.) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

advertisement

४) निशांत संतोष सावंत (पु / ०५ वर्षे/ राहणार - रूम नं. ०२, दीपा निवास, कृपेश्वर कॉलनी, भांडुप, मुंबई (प.) यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

५) सौरभ प्रकाश जाधव (पु / २६ वर्षे / राहणार - रूम नं. ०४, मातोश्री चाळ, समर्थ नगर, भांडुप, मुंबई (प.) यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

६) चंदन जैस्वाल (पु / २३ वर्षे/ राहणार - मनोरमा नगर, मानपाडा, ठाणे) यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.

७) अक्षय शर्मा (पु / २६ वर्षे/ राहणार- मनोरमा नगर, मानपाडा, ठाणे) डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

८) अजय परशुराम नरगडे (पु / १५ वर्षे / राहणार - एरोली, नवी मुंबई/ शिवशक्ती गोविंदा पथक, नवी मुंबई) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.

९) सर्वेश चव्हाण (पु / २७ वर्षे / राहणार - वागळे इस्टेट, ठाणे / बजरंग बली गोविंदा पथक) यांच्या छातीला दुखापत झाली आहे.

१०) शंकर पाटील (पु / २७ वर्षे / राहणार - गणपती चाळ, घोलाई नगर, कळवा/ भोलेश्वर गोविंदा पथक) यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

११) साहिल भोईर (पु / १९ वर्षे/ राहणार - बाळकुम पाडा नं. ०३, ठाणे / स्थानिक नागरिक) यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.

१२)अनुप यादव (पु / ३५ वर्षे / राहणार - अतकोनेश्वर, कळवा) त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल गोविंदा-(एकूण - ०५)

१) शिवराज पवार (पु / १० वर्षे / राहणार - साठे नगर, वागळे इस्टेट) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

२) रोहन पागे (पु / २४ वर्षे / राहणार - कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक) यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.

३)कल्पक पाटील (पु / ३५ वर्षे / राहणार - कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक) यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.

४) करण पवार (पु / १७ वर्षे / बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट / स्थानिक नागरिक) यांना किरकोळ खरचटलं आहे.

५) सिद्धू सुहास मुंडा (पु / ११ वर्षे / राहणार - बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट/ स्थानिक नागरिक) छातीला किरकोळ खरचटलं आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Dahi Handi 2025: 10 थर लागले पण 2 गोविंदा गेले, 11 वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश, दहीहंडी उत्सवाला गालबोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल