TRENDING:

सामूहिक अत्याचारानंतर महिला गरोदर, 17 पुरुषांची टेस्ट केली, DNA रिपोर्ट पाहून मुंबई पोलीस हादरले!

Last Updated:

20 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. सामूहिक अत्याचारानंतर ही मुलगी गरोदर राहिली, त्यानंतर 17 पुरुषांची चाचणी केली गेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 20 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. सामूहिक अत्याचारानंतर ही मुलगी गरोदर राहिली, त्यानंतर 17 पुरुषांची चाचणी केली गेली, तेव्हा मुलीच्या वडिलांची डीएनए टेस्ट मॅच झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये मुंबईत ही घटना घडली होती, त्यानंतर सप्टेंबरच्या सुमारास महिला 5 महिन्यांची गरदोर असल्याचं नोंदवण्यात आलं.
सामूहिक अत्याचारानंतर महिला गरोदर, 17 पुरुषांची टेस्ट केली, DNA रिपोर्ट पाहून मुंबई पोलीस हादरले! (AI Image)
सामूहिक अत्याचारानंतर महिला गरोदर, 17 पुरुषांची टेस्ट केली, DNA रिपोर्ट पाहून मुंबई पोलीस हादरले! (AI Image)
advertisement

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी याआधी एका पुरुषाला अटक केली आणि एका 17 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं. या दोघांनीही महिलेवर अत्याचार केले होते. दिव्यांग असलेली ही महिला ऐकू किंवा बोलू शकत नव्हती. सप्टेंबर महिन्यात महिलेच्या पोटात अस्वस्थता जाणवू लागली, त्यानंतर तिने इशाऱ्यानेच याबद्दल तिच्या आजीला सांगितलं. यानंतर महिलेच्या आजीने तिला रुग्णालयात नेलं, तिथे वैद्यकीय चाचण्यांमध्ये मुलगी गरोदर असल्याची पुष्टी झाली, त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि चौकशी सुरू करण्यात आली.

advertisement

वडिलांचा तक्रार करण्यास नकार

पीडित महिला सुरूवातीला जबाब देण्यास कचरत होती, दिव्यांग असल्यामुळे पोलिसांना तिच्यासोबत संवाद साधण्यातही अडचणी येत होत्या. पोलिसांनी तिच्या वडिलांची चौकशी केली तेव्हा त्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले, तसंच तक्रार दाखल करायलाही नकार दिला. अखेर पोलिसांनी समुपदेशन सत्र घेतल्यानंतर महिलेने तक्रार दाखल करण्यास सहमती दर्शवली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली.

advertisement

डीएनएमध्ये जुळली वडिलांची सॅम्पल

आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वडिलांसह 17 संशयितांचे डीएनए आणि रक्ताचे नमुने गोळा केले. याची तपासणी केली असता वडिलांचे डीएनए जुळत असल्याचं निष्पन्न झालं. आपल्यावर अनेक वेळा अत्याचार झाले आणि आरोपींनी मला कार्बोनेटेड पेय देऊन एकांत असलेल्या ठिकाणी नेले, असं महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. अनेकांनी महिलेच्या स्थितीचा फायदा घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. ही पेय महिलेला अशक्त करण्यासाठी वापरली जात होती का? याचा तपासही पोलीस करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरातील सर्वच खातील आवडीने, बनवा चवदार सोयाबीन पकोडे, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

याप्रकरणी पीडितेचे वडील मुख्य आरोपी आहेत, पण चौकशीचा भाग म्हणून आणखी लोकांची चौकशी सुरू आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलप 64(2) (i) आणि 64(2)(k) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
सामूहिक अत्याचारानंतर महिला गरोदर, 17 पुरुषांची टेस्ट केली, DNA रिपोर्ट पाहून मुंबई पोलीस हादरले!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल