मुंबई : इराण-इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती अजूनही कमी झालेली नाही. दिवसेंदिवस युद्धाचा तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहे. अशातच ओमानच्या किनारपट्टीजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनारपट्टीजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवलीतील २५ वर्षीय खलाशी दीक्षित सोळंकी याचा मृत्यू झाला आहे. दीक्षित सोळंकी हा ‘MKD व्योम’ या ऑइल टँकरवर काम करत होता, मस्कतच्या दिशेने प्रवासादरम्यान स्फोटकांनी भरलेली ड्रोन बोट जहाजावर धडकली, त्या वेळी इंजिन रूममध्ये काम करत असताना झालेल्या भीषण स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
advertisement
महिनाभरापूर्वीच दीक्षितच्या आईचं निधन झालं होतं. आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो मुंबईत आला होता. आता ओमानच्या किनारपट्टीवर झालेल्या हल्ल्यात दीक्षित सोळंकी याचा मृत्यू झााला आहे. या घटनेमुळे सोळंकी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या दीक्षित सोलंकी याचा मृतदेह भारतात आणला जाणार आहे, त्याचे कुटुंबीय आपल्या मुलाच्या पार्थिवाची वाट पाहत आहे.
काय घडलं नेमकं?
मिळाालेल्याा माहितीनुसार, १ मार्च रोजी ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ ‘MKD व्योम’ या टँकरवर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर ‘MKD व्योम’ या टँकरमध्ये भीषण स्फोट झाला होता. यावेळी मुंबईत राहणाऱ्या दीक्षित सोलंकी याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘MKD व्योम’ ही पेट्रोल वाहून नेणारी जहाज होती. मस्कटच्या किनाऱ्यापासून सुमारे ५ नॉटिकल मैल अंतरावर होती. त्यावेळी इस्त्रायल-अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याानंतर तेहराननं प्रत्युत्तर दाखल हल्ले केले होते. त्यादरम्यान ही घटना घडली.
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जहाजावर आग लागली होती. हल्ला झाला तेव्हा ही जहाज ८ फेब्रुवारी रोजी युरोपहून रवाना झाली होत. सौदी अरेबियातील रास तनुरा इथं पोहोचणार होती.
कोण आहे सोलंकी?
दीक्षित सोलंकी हाा मुंबईतील कांदिवली परिसरात राहणार आहे. तो मुळचा दादरा-नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित परिसरातील घोगला इथला रहिवासी होता. हा परिसर गुजरातमधील वेरावळ बंदराजवळ काठियावाड किनाऱ्याजवळ येतो. दीक्षित याचे वडील हे सुद्धा खलाशी होते. महिन्याभरापूर्वीच दीक्षित हा आईचं निधन झालं म्हणून मुंबईत आला होता. आईच्या निधनानंतर १० डिसेंबर २०२५ रोजी दीक्षित जहाजावर परतला होता. मागील ८० दिवसांपासून तो जहाजावर होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात आतापर्यंत ४ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं साांगण्यात येत आहे.
