सोन्या-चांदीनंतर आता थेट गॅस सिलिंडरवर नजर
कांदिवली पश्चिमेतील चारकोप भागात एका डिलिव्हराची वाहनातून 27 एलपीजी सिलिंडर चोरीला गेले आहेत. यामध्ये पाच भरलेल्या सिलिंडरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की काय घडलं?
या चोरीच्या घटने प्रकरणी नंदकुमार रामराज योनी या कर्मचाऱ्याने तक्रार दाखली केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी त्यांनी गॅस सिलिंडरने भरलेला टेम्पो घराजवळ असलेल्या चौकात उभा केला होता. काही वेळानंतर ते परत तिथं आले असता, टेम्पोच्या दरवाजाची काच फुटलेली दिसली शिवाय मागील बाजूचे कुलूपही तोडण्यात आले होते.
advertisement
योनी यांनी वाहन तपासले असता त्यातून सर्व 27 सिलिंडर चोरीला गेल्याचे लक्षात आले. तात्काळ या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्राक नोंदवली. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके ही तयार केली आहे.
चोरांचा शोध सुरू
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून काही संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात कैद ही झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लवकर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
