नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चुकवू नका
आजकाल साधी चहाची टपरी उघडण्यासाठीही लाखो रुपयांची गुंतवणूक लागते. मात्र अमूलची फ्रँचाईजी सुरू करण्यासाठी फार मोठी रक्कम लागणार नाही. फक्त 2 ते 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही अमूलचे आउटलेट सुरू करू शकता.
अमूलकडून दोन प्रकारच्या फ्रँचाईजी दिल्या जातात. पहिल्या प्रकारात 2 ते 2.6 लाख रुपयांत दूध आणि दुधाच्या अनेक पदार्थांचे आउटलेट सुरू करता येते. यासाठी 100 ते 150 स्क्वेअर फूट जागा लागते. यात सिक्युरिटी डिपॉझिट, दुकानाचे नूतनीकरण आणि उपकरणांचा खर्च समाविष्ट असतो.
advertisement
दुसऱ्या प्रकारात 6 लाख रुपयांची गुंतवणूक करून आलिशान आईस्क्रीम पार्लर सुरू करता येतो. अमूल फ्रँचाईजीची खास बाब म्हणजे कंपनीला कोणतीही रॉयल्टी द्यावी लागत नाही. योग्य ठिकाणी दुकान असल्यास महिन्याला 40 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे.
