2 तास मोबाईल आणि टीव्ही राहणार बंद, महाराष्ट्रातील या गावाने घेतला निर्णय, Video पाहून कराल कौतुक
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम लक्षात घेता जालना जिल्ह्यातील एका शाळेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
जालना : मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम लक्षात घेता जालना जिल्ह्यातील एका शाळेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावातील मंदिर-मशिदीवरील भोंग्यामधून रात्री दोन तास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सांगितले जात आहे. या काळात कोणताही विद्यार्थी मोबाईल किंवा टीव्ही पाहणार नाही याची खातरजमा केली जात आहे. या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे.
जालन्यातील पिंपरखेडा गरड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जालना जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब खरात आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापक विजय कुमार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा डिजिटल डिटॉक्स आणि अभ्यास अभियान सुरू झाले आहे. आजचे तरुण हे देशाचे भविष्य असल्याने ते शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ बनावे या उद्देशाने वाटूर आणि परिसरातील सर्व धार्मिक स्थळांना यात सहभागी करून घेण्यात आले आहे.
advertisement
या उपक्रमांतर्गत रोज सायंकाळी सात वाजता गावातील मंदिर, मस्जिद, समाज मंदिर, गुरुद्वारा आणि विहारावरील स्पीकरवरून अभ्यासाची वेळ झाल्याची घोषणा (अनाउन्समेंट) केली जाईल. यावेळी पालकांना घरातील मनोरंजनाची साधने बंद करून मुलांना अभ्यासाला बसवणे बंधनकारक असणार आहे.
advertisement
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नियोजित बैठकीला वाटूर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार खंदारे, वाटूरचे सरपंच कमलताई केशर खाने, माजी उपसरपंच अझहर भाई शेख यांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. 19 डिसेंबर 2025 पासून या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जालन्यातील इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
अभ्यासाचे वेळापत्रक आणि नियम
सायंकाळी सात वाजता भोंग्यावरून सूचना मिळताच टीव्ही आणि मोबाईल बंद करणे.
सायंकाळी सात ते दहा ही वेळ सलग अभ्यासासाठी राखीव.
पहाटे पाच ते सात या वेळेतही मोबाईल वापरास बंदी आणि अभ्यास सत्र.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/जालना/
2 तास मोबाईल आणि टीव्ही राहणार बंद, महाराष्ट्रातील या गावाने घेतला निर्णय, Video पाहून कराल कौतुक








