Success Story : नेहमीच्या पिकांना दिला फाटा, शेतकऱ्यानं केला तोडले शेतीचा प्रयोग, उत्पन्न लाखात! Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी द्वारकादास पाथ्रीकर यांनी नेहमीच्या पिकांना बाजूला ठेवत तोडले शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात क्वचित दिसणाऱ्या तोडले शेतीच्या प्रयोगानं फुलंब्री तालुक्यातील पाथ्री भागात चर्चा सुरू झाली आहे. पाथ्रीचे प्रयोगशील शेतकरी द्वारकादास पाथ्रीकर यांनी नेहमीच्या पिकांना बाजूला ठेवत तोडले शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. चार बाय चार अंतरावर तोडले झाडांची लागवड त्यांनी केली आहे. या पिकातून चांगलं उत्पादन निघत असल्याचं दिसून येत आहे. या शेतीकडं पाहायला आजूबाजूच्या गावातून शेतकरी येत आहेत. तोडल्याला बाजारात सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे या पिकातून 2 ते 2.50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा द्वारकादास पाथ्रीकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
शेतीमध्ये काहीतरी वेगळा आणि नवीन प्रयोग करायचा या उद्देशाने पाथ्री येथे एक एकर क्षेत्रात तोडले आणि कंटुले लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन्ही पिके एकत्र कुठेच पाहायला मिळत नाही. कंटुलेची लागवड बऱ्याच ठिकाणी सध्या झालेली आहे. मात्र नंतर तोडल्याची लागवड करण्याचे ठरवले.
advertisement
मांजरवाडी जवळील मंचर या ठिकाणाहून 35 रुपयांना एक रोप आणले आणि शेतामध्ये मंडपासारखा या रूपांना आकार देण्यात आला. तोडले हे झाड जवळपास 15 ते 16 वर्ष उत्पादन देते आणि तोडले शेतीत येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गरजेप्रमाणे रोपं तयार करणार आहे. तसेच येणाऱ्या काळात कंटुले शेती देखील करणार असल्याचे पाथ्रीकर यांनी म्हटले आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वी बाजारामध्ये तोडले 60 ते 70 रुपये किलो दराने विकल्या गेले. सध्या 40 ते 50 रुपये भाव तोडल्यांना सुरू आहे. या पिकातून नुकसान कमी होते आणि उत्पन्न समाधानकारक मिळते. मात्र यामध्ये सातत्य आणि नियोजन पद्धतीने मेहनत करणे गरजेचे आहे. तोडले शेतीचा नवीन प्रयोग असल्यामुळे या पिकावर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणत्या औषधांची फवारणी करावी, कशा पद्धतीने काळजी घ्यावी याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : नेहमीच्या पिकांना दिला फाटा, शेतकऱ्यानं केला तोडले शेतीचा प्रयोग, उत्पन्न लाखात! Video









