डोंबिवली पश्चिमेतील राजनगर परिसरात ही घटना घ
[video width="464" height="832" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/dombivali-video-2026-03-203ae9f4b42040b15372a5e8cb84a67d.mp4"][/video]
डली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक डंपर चालक रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडील फरफटवताना दिसत आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर व्हिडिओ पाहता या डम्पर चालकांना मातीची ने आण करायची होती. एका ठिकाणाहून माती आणून ती दुसरा ठिकाणी ओतायची. यासाठी अनेक डम्पर चालक काम करत होते. अशाचप्रकारे एक डम्पर चालक देखील काम करत होता.पण अचानक त्याचा काय मनात आलं काय माहिती त्याने समोर उभ्या असलेल्या एका कारला फरफटत नेलं आहे. चारचाकीला फरफटत नेताना समोर एक डम्पर देखील उभा आहे. या डम्परवर देखील चारचाकी आदळली आहे.त्यामुळे त्याच्या काचा आणि बोनेटचा भाग तुटण्याची शक्यता आहे. दरम्यान या कार चालकाचा मालक गाडीत होता का? याची अद्याप काय माहिती मिळू शकली नाही आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणात वेतन थकित राहिल्याच्या संतापातून एका डम्पर चालकाने ठेकेदार मालकाची कार डम्परने फरफटत नेत नुकसान केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील राजनगर परिसरात घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
