कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अनिष्काला फॅशन फोटोग्राफीची विशेष आवड निर्माण झाली. पुढे हीच आवड आणि घरातील महिलांकडून मिळणाऱ्या फॅशन सल्ल्यांची मागणी यामुळे तिने काम करणाऱ्या महिलांसाठी खास साधेपण स्टायलिश कपडे डिझाईन करण्यास सुरुवात केली. ऑफिससाठी योग्य, रिव्हर्सेबल आणि आरामदायक टॉप्स हे ‘अर्ना बुटीक’चं वैशिष्ट्य बनलं. "काम करणाऱ्या महिलांना स्टाईलसह आत्मविश्वास मिळावा यासाठी मी डिझाईन करायला सुरुवात केली," असं अनिष्का सांगते. तिच्या घरच्यांनी सुरुवातीला ग्राहक बनून प्रोत्साहन दिलं आणि तोंडी प्रसिद्धीमुळे बुटीकला ओळख मिळू लागली.
advertisement
सोशल मीडियाचा फारसा प्रभाव नसतानाही तिच्या मेहनतीच्या जोरावर व्यवसाय वाढू लागला. आज अर्ना बुटीकच्या ठाणे, पनवेल आणि पुणे अशा तीन शाखा असून अनिष्का महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत कमावते. आज अर्ना बुटीक फक्त ब्रँड नाही तर सेलिब्रिटी ब्रँड बनला आहे. स्पर्धा, आर्थिक अडचणी आणि व्यवसायातील नवीनता या सगळ्यांवर मात करत तिने हे यश मिळवलं. प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतल्यामुळे ब्यूटिक आणखी ओळख मिळाली. अनिष्काचा अनुभव सांगतो की, स्वप्नं साकार करताना चिकाटी आणि मनापासून केलेली मेहनत महत्त्वाची असते. "नेहमी आपल्या मनाचं ऐका, तेच खरं मार्गदर्शक असतं," असा तिचा सल्ला नवउद्योजकांना आहे.